Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ultra Jhakaas ची पहिली वाहिली सिरीज ‘IPC’ चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी पाहता येणार सिरीज

मराठीत बराच वेळ ओटीटीवर कोणतीही सिरीज रिलीज झाली नव्हती, ज्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु आता लवकरच अल्ट्रा झकास त्यांची पहिली सिरीज ओटीटीवर येणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 21, 2024 | 07:41 PM
Ultra Jhakaas ची पहिली वाहिली सिरीज ‘IPC’ चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार सिरीज

Ultra Jhakaas ची पहिली वाहिली सिरीज ‘IPC’ चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार सिरीज

Follow Us
Close
Follow Us:

अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ 25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ हि वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राइम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवी कोरी वेब सीरिज देखील प्रदर्शित करणार आहे.

या वेब सिरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर,सुरेश विश्वकर्मा व अभिनय सावंत ह्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. कोकणातील छोट्या गावात शिमगोत्सवाच्या दिवशी एका २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होतो आणि सुरु होते एक रहस्यमय थरारक घटनांची शृंखला जी वास्तवात घेऊन येते कल्पनेच्या पलीकडले सत्य, जे उलगडणार २५ ऑक्टोबरला.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राजेश चव्हाण या सिरीजचे दिग्दर्शक आहेत,आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे.

हे देखील वाचा: लगीनघटीका समीप आली! शोभिता धुलिपाला होणार नागा चैतन्यची वधू, लग्नाच्या विधींना झाली सुरुवात

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर ‘IPC’ हि पहिली वेब सिरीज प्रदर्शित होणार असून हि तुम्हाला जगभरात कुठेही पाहता येईल.या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एक नवी मराठी वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारच्या कथा अनुभवायला मिळतील.”

‘IPC’ मराठी या वेब सिरीजचे दिग्दर्शक राजेश चव्हाण म्हणाले, “मी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे आभार मानतो कि त्यांनी त्यांची महत्त्वाची अशी पहिली वेब सिरीज दिग्दर्शन करण्याची संधी मला दिली. हि वेब सिरीज दिग्दर्शित करण्यामागचा अनुभव फारच वेगळा आणि एक जवाबदारीपूर्ण होता. ‘IPC’ या गंभीर विषयावर वेब सिरीज तयार करण्यामागे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड कंपनीचा खूप मोठा पाठींबा आणि विश्वास होता.”

ही सिरीज कुठे पाहता येणार?

अल्ट्रा झकास हे भारतातील पहिला असा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनलिमिटेड मराठी कंटेंट मिळेल. सोबतच दर महिन्याला नवीन ओरिजिनल वेब सिरीज पाहता येईल. अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला पूर्ण वर्षभराचे मनोरंजन अवघ्या 199/- रुपयांत पाहता येणार हे या ॲपचे वैशिष्ट आहे. 3000+ तासांचा अनलिमिटेड कंटेंट, मराठी चित्रपट, विनोदी नाटकं आणि बरंच काही तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि तासंतास मनोरंजनाचा आनंद मनसोक्त लुटता येईल.

Web Title: Ultra jhakaas originals first ever series ipc is releasing in this october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 07:41 PM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

मुलगा की मुलगी? कॉमेडियन भारती सिंगने परदेशात केली बाळाची लिंग तपासणी? स्वतःच सोडले मौन
1

मुलगा की मुलगी? कॉमेडियन भारती सिंगने परदेशात केली बाळाची लिंग तपासणी? स्वतःच सोडले मौन

‘माय वं’ खानदेशी भाषा शिकायला 1 महिना मेहनत घेतली – ऐश्वर्या शेटे
2

‘माय वं’ खानदेशी भाषा शिकायला 1 महिना मेहनत घेतली – ऐश्वर्या शेटे

Amitabh Bachchan यांनी 83 व्या वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट, पहाल तर डोळे विस्फारतील
3

Amitabh Bachchan यांनी 83 व्या वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट, पहाल तर डोळे विस्फारतील

पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन
4

पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.