Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक...
आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ओळखला जातो. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटातील अभिनयाचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे. कोणतीही भूमिका असो, अगदी लिलया पार पाडणारा अभिनेता लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या चित्रपटामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्याने नुकतंच मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने आलिया आणि रणबीर सोबत करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
विकी कौशलचे चाहते सध्या त्याच्या ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटासाठी कमालीचे आतुर आहेत. अलिकडेच करीना कपूरने (Kareena Kapoor) ‘द हॉलिवूड रिपोर्टर’साठी अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)सोबत खास संवाद साधला. यादरम्यान दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले. या गप्पांमध्ये करिनासोबत बोलताना विकीने रणबीर आणि आलियासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.
विकी कौशलने ‘द हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर आणि आलियासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. विकी म्हणाला, “दोघांसोबतही माझा काम करण्याचा अनुभव फारच विशेष आहे. याशिवाय रणबीर आणि आलिया हे दोघंही खूप चांगले व्यक्ती आहेत. मी रणबीरसोबत ‘संजू’मध्ये आणि आलियासोबत ‘राझी’मध्ये काम केले आहे. दोघांसोबत काम करताना मला खूप मजा आली. पण, सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत मी काम करण्याची माझी पहिलीच वेळ होती.”
खरंच! छोटा पुढारीचं निधन? बिग बॉस अभिनेत्याचा हार घातलेले फोटो व्हायरल
सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विकी म्हणाला की, “कोणत्याही गोष्टीसाठी भन्साळी सर एका लहान मुलासारखे वागतात. ते कोणत्याही अभिनेत्याला, सीन्सला आणि कॅमेऱ्यालाही खूपच एक्सप्लोर करतात आणि त्यातून काहीतरी अद्भुत गोष्ट काढण्याचा ते प्रयत्न करतात. ते नेहमीच विचार करतात की, मी यामध्ये आणखी काय वेगळं करू शकतो. मी ते आणखी सिनेमॅटिक आणि सुंदर कसे बनवू शकतो. माझ्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार वेगळा होता.”