विराट कोहलीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला अयोध्येतील प्रस्तावित प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. यापूर्वी सोमवारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रासोबत दिसत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील.
तत्पूर्वी सोमवारी झारखंडचे भाजप संघटन मंत्री कर्मवीर सिंह यांनी महेंद्रसिंग धोनी यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी निमंत्रण पत्र सादर केले. त्यानंतर कॅप्टन कूलने त्याला आमंत्रित करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. सचिन तेंडुलकरला 13 जानेवारीला निमंत्रण पत्र मिळाले. विराट कोहलीशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग या क्रिकेटपटूंना अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे.
Virat Kohli and his wife Anushka Sharma, received an invitation for the Pan Pratishtha of Shree Ram at Ayodhya. ?? Kohli traveled directly to Mumbai after the match to receive the invitation himself and now going to Bangalore for national duties. What a guy. ❤️ pic.twitter.com/ZuGt3prwwR — ????????!??_?? (@bholination) January 16, 2024
22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी ६ हजार विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेटर्सशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. त्याचवेळी राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.