Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेची सुरुवात होणार आहे. या यावर्षी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अनेक विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 02, 2026 | 06:28 PM
IND vs NZ: Sachin Tendulkar's 'world record' is in danger! Virat Kohli will achieve this 'great feat' in 2026; read in detail

IND vs NZ: Sachin Tendulkar's 'world record' is in danger! Virat Kohli will achieve this 'great feat' in 2026; read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli will break Sachin Tendulkar’s record : भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. ११  जानेवारीपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेपासूनच भारतीय संघ २०२६ मध्ये आपल्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. दरम्यान, या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर खास नजरा असणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराटने आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध देखील त्याच्याकडून अशाच फॉर्मची अपेक्षा असणार आहे. दरम्यान, या मालिकेत विराट कोहलीला अनेक विक्रम रचण्याची संधी असून त्याच्यामुळे सचिन तेंडुलकरचा विक्रय देखील धोक्यात आला आहे.

हेही वाचा : मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

विराटच्या रडारवर तेंडुलकरचा विश्वविक्रम

भारताचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला वर्षाच्या सुरवातीलाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक विश्वविक्रम मोडण्याची संधी असणार आहे. ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत तो मोठे टप्पे गाठण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. विराट कोहली , आता २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यापासून फक्त २५ धावा दूर आहे. हा टप्पा पार केल्यानंतर, तो ही कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे. तसेच, तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा डावांच्या बाबतीत सर्वात जलद २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम देखील मोडणार आहे.

सचिनचा विक्रम मोडला जाणार

आजपर्यंत केवळ दोनच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. तसेच महान सचिन तेंडुलकर, ज्याने ६४४ डावांमध्ये २८,००० धावा फटकावल्या आहेत. तर दूसरा श्रीलंकेचा महान कुमार संगकारा, ज्याने २०१५ मध्ये भारताविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना ६६६ डावांमध्ये २८,०१६ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये खुणावतोय ‘हा’ विक्रम

विराट कोहलीला आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे. आयपीएलमध्ये ९,००० धावा करण्यासाठी त्याला फक्त ३३९ धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत, विराट कोहलीने २५९ डावांमध्ये ८,६६१ धावा काढल्या आहेत.  ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत रोहित शर्मा ७,०४६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

एकदिवसीय स्वरूपात १५,०००  धावांचा टप्पा करणार पार

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहचला आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) यांच्या नावावर जमा आहे. विराट कोहलीने २९६ डावांमध्ये १४,५५७ धावा काढल्या असून १५,००० एकदिवसीय धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी ४४३ धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : 2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या जवळ आला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसह ६२३ डावांमध्ये आतापर्यंत २७,९७५ धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी ४२ धावा केल्या तर तो कुमार संगकाराला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी सज्ज होईल.

Web Title: Ind vs nz virat kohli has a chance to break sachin tendulkars world record in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral
1

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…
2

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.