कोट्यवधींचा घोटाळा अन् बरंच काही...; ‘राज’फेम अभिनेता अडकला कायद्याच्या कचाट्यात, भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून चौकशी
मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मारिया (Dino Mariya) याची चौकशी केली आहे. सोमवारी (२६ मे) मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात अभिनेत्याची चौकशी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये असलेल्या मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या करारामध्ये अभिनेत्याने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय दिनो आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम हे एकमेकांच्या संपर्कात होते. या संपूर्ण प्रकरणातील केतन हा मुख्य आरोपी आहे, ज्याला या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणामध्ये अभिनेत्याचाही कसा सहभाग आहे, जाणून घेऊया…
जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक रहस्यमय गोष्ट; ‘समसारा’चं गूढ केव्हा उकलणार?
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकासोबत अभिनेता दिनो मोरियाचे संबंध समोर आले आहेत. त्यानंतर तो मुंबई पोलिसांच्या रडारवरही आला आहे. या घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने गाळ काढण्याची वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची सोमवारी सकाळी ११ वाजता ईओडब्लू कार्यालयामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले. ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की, मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेक फोनवरून संभाषण केले आहे. यानंतर, आज पोलिसांनी मोरिया यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले.
‘सन मराठी’वर रंगणार महिला स्पेशल कार्यक्रम, ‘सोहळा सख्यांचा’ शोमध्ये हजारो महिलांचा सहभाग
सध्या, पोलिस मुख्य आरोपीसोबत डिनो आणि त्याच्या भावाचे काय संभाषण झाले याचा तपास करत आहेत. कॉल रेकॉर्ड पोलिसांनी पुरावे म्हणून सादर केले होते आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. केतन कदम आणि त्याचा सहआरोपी जयेश जोशी यांच्यासंबंधित कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान डिनो मोरियाचे नाव पुढे आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्याची सहभाग आणि दोन्ही पक्षांमधील व्यवहारांची माहिती पुष्टी करण्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या “वामा- लढाई सन्मानाची” चित्रपटाला दमदार प्रतिसाद
मिठी नदीचा घोटाळा नेमका काय?
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आता उघडकीस आला आहे. कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या मशिनरीसाठी कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांनी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप करण्यात आलाय. मॅटप्रॉप अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांव्यतिरिक्त या प्रकरणात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, आतापर्यंत फक्त केतन कदम आणि जयेश जोशी यांना अटक करण्यात आली आहे.