Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि "शोले" चित्रपटाचे जेलर असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. नरक चतुर्दशीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 20, 2025 | 10:40 PM
असरानी यांच्यावर लगेच अंतिम संस्कार का करण्यात आले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

असरानी यांच्यावर लगेच अंतिम संस्कार का करण्यात आले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • असरानी यांचे अंत्यविधी पूर्ण
  • घाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार
  • असरानी यांची शेवटची इच्छा 

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते असरानी यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. पाच दिवसांपूर्वी पंकज धीर यांचे निधन झाले आणि आता असरानी यांचेही निधन झाले आहे. २० ऑक्टोबर रोजी दिवाळीला असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच संध्याकाळी अभिनेत्याचे अंतिम संस्कारदेखील करण्यात आले. इतक्या घाईघाईत असरानी यांचे अंतिम संस्कार का करण्यात आले? कोणालाही त्यांचे अंतिम दर्शनदेखील घेता आले नाही आणि याबाबत नक्की काय कारण आहे हे असरानी यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी स्पष्ट केले आहे.

बाबूभाई थिबा यांनी नवभारत टाईम्स डॉट कॉमला सांगितले की, १५-२० दिवसांपूर्वी असरानी यांना अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन

नक्की काय झाले होते?

बाबूभाई यांनी स्पष्ट केले की, “१५-२० दिवसांपूर्वी असरानी यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांना चार दिवसांपूर्वीच आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथेच त्यांचे निधन झाले. असरानी यांच्या फुफ्फुसात पाणी भरले होते” 

घाईत अंतिम संस्कार का?

बाबूभाईंनी सांगितले की, २० ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान असरानी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार इतक्या घाईघाईने का करण्यात आले असे विचारले असता बाबूभाई यांनी सांगितले की,, “त्यांच्या पत्नीने मला सांगितले की ते कोणालाही सांगू इच्छित नाहीत. असरानी यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांनी पत्नीला सांगितले होते की शेवटचे विधी कोणालाही न सांगता शांततेत पार पाडा.”

अभिनेत्री मंजू बन्सलसह लग्न 

असरानी यांचे लग्न अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी झाले होते आणि त्यांच्यामागे पत्नीशिवाय कोणतेही कुटुंब नाही. त्यांना मूलबाळ नव्हते. असरानी आणि मंजू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. १ जानेवारी १९४१ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. असरानी यांना लहानपणापासूनच अभिनय आणि चित्रपटांची आवड होती, म्हणून ते अनेकदा चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पळून जात असत.

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम

असरानी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे आणि शोककळा पसरली आहे. पंकज धीर यांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप कोणीही सावरले नव्हते आणि आता आणखी एक दुर्मिळ रत्न निघून गेले आहे. असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या. परंतु “शोले” मधील जेलरच्या भूमिकेसाठी लोक अजूनही त्यांना आठवतात आणि त्यांचे कौतुकही करतात. 

Web Title: Why asrani funeral done in hurry manager revealed actor didnt want news after his death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 10:40 PM

Topics:  

  • Death
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण
1

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन
2

Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन

‘एकम’मध्ये अमृता खानविलकरची पहिली दिवाळी, पांढऱ्याशुभ्र पारंपरिक सलवार सूटमध्ये चाहत्यांचे वेधले लक्ष
3

‘एकम’मध्ये अमृता खानविलकरची पहिली दिवाळी, पांढऱ्याशुभ्र पारंपरिक सलवार सूटमध्ये चाहत्यांचे वेधले लक्ष

‘४० वर्षांहून अधिक…’, पंकज धीर यांच्या निधनाने भावूक झाले पुनीत इस्सर, लिहिली ही खास पोस्ट
4

‘४० वर्षांहून अधिक…’, पंकज धीर यांच्या निधनाने भावूक झाले पुनीत इस्सर, लिहिली ही खास पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.