(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे १५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्याच सहकलाकारांपैकी एक, ‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेता पुनीत इस्सर हे पंकज धीर यांच्या जाण्याने खूप भावूक झाले आहेत.पुनीत इस्सर यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्या दोघांचे जुने फोटो आणि आठवणी शेअर केल्या आहेत.
पुनीत इस्सर यांची भावुक पोस्ट
पुनीत इस्सर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंकज धीर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, “माझा सर्वात चांगला मित्र आणि भाऊ… आता या जगात नाही.”
या पोस्टमधून त्यांच्या दोघांमधील घट्ट नातं आणि प्रेम स्पष्ट दिसून येतं. चाहतेही या पोस्टवर शोक व्यक्त करत आहेत आणि पंकज धीर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
आई झाल्यानंतर Deepika Padukoneने केला मोठा बदल, इन्स्टाग्रामवर दिसली खास झलक, फोटो होत आहेत व्हायरल!
पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “हे खरंच एक खूप मोठं नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबासाठी, संपूर्ण इंडस्ट्रीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी. आणि माझ्यासाठीही हे वैयक्तिक पातळीवर खूप मोठं नुकसान आहे. आमचं नातं खूप खास होतं. आपण अशा इंडस्ट्रीत काम करतो जिथे अनेक वेळा दोस्तीपेक्षा स्पर्धा आणि द्वेष जास्त असतो, आणि खरे मित्र फारच कमी असतात.”
पुनीत इस्सर यांनी पुढे लिहिलं,”मी आणि पंकज यांची मैत्री ४० वर्षांहूनही अधिक जुनी होती. अशा फारच थोड्या व्यक्ती असतात जे नात्यांची खरी किंमत समजतात आणि त्याचा सन्मान करतात. आमच्याकडे सगळं काही होतं. आणि जसं महाभारतात कर्ण आणि दुर्योधनाचं अतूट नातं होतं, तसंच आमचंही. आम्ही एक खरा, प्रामाणिक आणि विश्वासू प्रवास केला, जो एका खर्या माणसाचा प्रवास होता.”
Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी
पंकज धीर हे सिनेसृष्टीतलं असं एक नाव आहे, जे कायमच लोकांच्या मनामध्ये जिवंत राहील. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली. मग ते महाभारतमधील कर्ण असो, किंवा इतर चित्रपट व मालिकांमधील भूमिकां.