जेठालाल- बबिता नसताना ‘तारक मेहता का...’ शो TRP मध्ये पहिल्या स्थानावर; भिडे मास्तरांनी सांगितलं सर्व काही
गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोने प्रेक्षकांचे मन जिंकले. मालिकेतल्या कलाकारांनी प्रेक्षकांचे जिंकले असून २००८ पासून या शोने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. देशासह परदेशातही या शोचा फार मोठा चाहतावर्ग आहे. कायमच मालिकेतल्या वेगवेगळ्या ट्रॅकमुळे चर्चेत राहणारी ही मालिका सध्या टीआरपीमुळे चर्चेत आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सतत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’हा शो पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गेल्या अनेक काळापासून अभिनेत्री रुपाली गांगुलीची ‘अनुपमा’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार प्लसवरील या मालिकेलाही प्रेक्षकांचा अनेक काळापासून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु आता दोन आठवड्यापासून ‘अनुपमा’च्या ऐवजी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. मालिकेमध्ये सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मंदार चांदवाडकर यांनी अलिकडेच ई- टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर कशी आली ? या प्रश्नावर भाष्य केले.
‘बिग बॉस’ फेम Abdu Rozik च्या अटकेबाबत टीमने दिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘आमच्याकडे शब्द नाहीत…’
मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणाला की, “आम्हाला एका गोष्टीचा गर्व आहे की, गेल्या १७ वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून मालिकेला प्रचंड प्रेम मिळत आहे. सुरुवातीला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळत होते, तसेच ते आजही मिळत आहे. टीआरपीच्या बाबतीत हा शो अजूनही चांगला कामगिरी करीत आहे आणि ही एक मोठी कामगिरी आहे. आमच्या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली असून १८ व्या वर्षात आम्ही पाऊल ठेवत आहोत. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छितो. गेल्या काही वर्षांत मालिकेत अनेक लोकं आले आणि गेले. परंतु या शोने स्वत:चे स्थान टिकवून ठेवले आहे. त्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आमचे निर्माते असित कुमार मोदी आहेत.”
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरी, लाखो रुपये घेऊन चोर फरार
“मालिकेचे निर्माते अजूनही कायम लेखकांसोबत बसून काम करतात, त्यावेळी ते प्रत्येक कथा आणि प्रत्येक पात्रावर अभ्यास करत काम करतात. शो टीआरपीच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर असल्याचं कारण म्हणजे, सध्या मालिकेमध्ये सुरु असलेलं भुतनी ट्रॅक. हा ट्रॅक चाहत्यांना फार आवडत आहे. प्रेक्षकांना गोकुळधाममधील रहिवाशांना अडचणीत पाहणे आवडते. ‘भूतनी’ ट्रॅकवरील प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहेत. चाहते यावर रील आणि मीम्स बनवत आहेत.” ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या आगामी एपिसोडमध्ये एका मोठ्या ट्विस्टबद्दलची माहिती अभिनेत्याने दिली, तो म्हणाला, “आम्ही क्लायमॅक्समध्ये एका मोठ्या ट्विस्टची तयारी करत आहोत. प्रत्येक एपिसोडसोबत मालिकेतल्या कथानकातील अधिक गोष्टी मनोरंजक होत आहेत. या ट्रॅकला वेगळे बनवणारी खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच त्यात फक्त एकच मुलगी आहे. परंतु तिच्याबद्दल दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आहेत आणि येथूनच विनोद आणि गोंधळ सुरू होतो.”