(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते होते आणि ते बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. एवढेच नाही तर हे अभिनेते केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही एक मोठे नाव आहेत. आज १३ जुलै रोजी कोटा श्रीनिवास राव यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ही बातमी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का देणारी आहे. त्यांचे चाहते, राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले आहेत, ज्याचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाला कलाकार भावुक होताना दिसले आहेत.
तेलंगणा भाजप अध्यक्षांनी व्यक्त केला शोक
तेलंगणा भाजप अध्यक्ष एन रामचंद्र राव यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट उद्योग शोकाकुल आहे. त्यांचे निधन केवळ तेलगू चित्रपट उद्योगासाठीच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योग आणि भाजपसाठीही मोठे नुकसान आहे.’ असे म्हणून त्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
#Brahmanandam garu emotional words about #KotaSrinivasaRaoGaru pic.twitter.com/YEl9Fl1H0Q
— Telugu Funda (@TeluguFunda) July 13, 2025
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरी, लाखो रुपये घेऊन चोर फरार
अनेक दिग्गज लोक अंत्यदर्शनासाठी झाले सामील
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण दिवंगत अभिनेत्याच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचले. तसेच साऊथ स्टार ब्रम्हानंदम हे देखील अभिनेत्याच्या अंत्यसंस्कारात सामील झाले होते ते अभिनेत्याच्या आठवणीत भावुक होताना दिसले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही दिवंगत अभिनेत्याच्या घरी भेट दिली. त्यांनी सांगितले की, ‘अभिनेत्याने त्यांच्या चार दशकांच्या सिने कारकिर्दीत अमूल्य योगदान दिले आहे.’
#WATCH | Hyderabad, Telangana: Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu says, “Kota Srinivasa Rao was a great actor. Nobody can replace him. He worked for the last four decades, acting in 750 films in Kannada, Tamil, Telugu, and Hindi… He got 7 Nandi Awards and he was also an MLA… https://t.co/BE3xNxkqyJ pic.twitter.com/dj3hwSk7Rf
— ANI (@ANI) July 13, 2025
‘बिग बॉस’ फेम Abdu Rozik च्या अटकेबाबत टीमने दिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘आमच्याकडे शब्द नाहीत…’
टॉलिवूड मेगास्टार चिरंजीवी यांनी श्रीनिवास राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. चिरंजीवी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. चिरंजीवी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाची बातमी खूप दुःखद आहे. त्यांनी आणि मी एकाच वेळी ‘प्रणम खरेदू’ या चित्रपटाने आमच्या कारकिर्दीची सुरुवात केली.’ असे लिहून अभिनेत्याने स्वतःचे दुःख व्यक्त केले आहे.