(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
71st National Awards: ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा भव्यदिव्य पद्धतीने२३ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध भाषांतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटांना सन्मानित करण्यात आलं. ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका पाहिला मिळाला‘श्यामची आई’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट असा गौरव मिळाला. पुरस्कार सोहळ्यादरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर दुसरीकडे नाळ २ चित्रपटातील बालकलाकर , त्रिशा ठोसर आणि श्रीनिवास पोकळे या दोघांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलं.
71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ साठी अमृता अरूणराव यांनी नऊवारी साडीत हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. नऊवारी नेसून पुरस्कार स्वीकारत अमृता अरूणराव यांनी मराठमोळ्या संस्कृतीचा मान वाढवला, ‘श्यामची आई’ हा चित्रपट साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित असून त्यात स्वातंत्र्यपूर्व भारतातील ग्रामीण जीवन, कुटुंबातील नाती, आणि आईच्या मायेची अमूल्य ओळख प्रभावीपणे मांडली आहे. शिस्त, त्याग, प्रेम आणि संस्कार यांची शिकवण देणारी ही कथा आहे.चित्रपटात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर यांसारख्या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
विक्रांत मॅसीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पारितोषिक! ‘12th फेल’मधील अभिनयासाठी गौरव…
‘नाळ २’ हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते,चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी केले असून, निर्माता नागराज मंजुळे यांच्या पॅनलखाली झी स्टुडिओज आणि अटपट प्रॉडक्शन्सने हा चित्रपट साकारला आहे. या चित्रपटात दीप्ती देवी, जितेंद्र जोशी, देविका दफ्तारदार, त्रिशा ठोसर यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील बालकलाकरांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.