(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
विक्रांत मॅसीने ‘12th फेल’ या चित्रपटातील आपल्या जबरदस्त अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावून भारतीय सिनेसृष्टीत आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. संवेदनशील अभिनय आणि भूमिकांमधील सखोलतेसाठी ओळखला जाणारा विक्रांत आता या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जात आहे.
‘12th फेल’ या चित्रपटात विक्रांतने मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आहे. एक अशा तरुणाची कथा, जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयपीएस अधिकारी बनतो. विक्रांतचा अभिनय या चित्रपटात केवळ हृदयाला भिडणारा नव्हता, तर प्रेरणादायकही होता.
या भूमिकेमुळे त्याला मिळालेलं राष्ट्रीय पारितोषिक हे यंदाच्या सर्वात योग्य आणि सन्माननीय विजयांपैकी एक मानलं जात आहे.चित्रपटात त्याने साकारलेली परफॉर्मन्स इतकी जिवंत आणि प्रामाणिक होती की प्रेक्षक केवळ शर्मा यांच्या संघर्षाशी जोडले गेले नाहीत, तर तो संघर्ष त्यांनी अनुभवला. विक्रांतच्या अभिनयाने संपूर्ण कथेला वेगळ्याच उंचीवर नेलं आणि त्याला या पिढीतील अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित अभिनेत्यांपैकी एक म्हणून सिद्ध केलं.
विक्रांतसाठी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक यश नाही, तर त्यांनी साकारलेल्या त्या जीवनकथेप्रती एक प्रकारची श्रद्धांजली आहे. ‘12th फेल’ ही केवळ एक फिल्म नव्हती, ती एक चळवळ बनली,जिच्याशी हजारो विद्यार्थी, स्वप्न पाहणारे तरुण आणि सामान्य लोक स्वतःला जोडून पाहू लागले.
‘चंद्रघंटा देवी माझ्या स्वभावाशी जुळणारी आहे’ अभिनेत्री शिवानी सोनारने देवीशी स्वतःची तुलना का केली?
उद्योगातील अनेक दिग्दर्शक, सहकारी कलाकार आणि चाहते या सन्मानाचा जल्लोष करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की विक्रांतची ही विजयगाथा हे दाखवून देते की खरी कहाणी आणि दमदार अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनाला भिडतात.
टेलिव्हिजनपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेता होण्यापर्यंतचा विक्रांतचा प्रवास स्वतःतच एक प्रेरणादायी कथा आहे, अगदी त्यांच्या पडद्यावरील पात्रांप्रमाणे.‘12th फेल’मधील त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी सर्वत्र त्यांचं कौतुक झाल्यानंतर विक्रांत आता आपल्या पुढील चित्रपट ‘व्हाइट’च्या तयारीत व्यस्त आहे. ही एक बहुप्रतीक्षित ऐतिहासिक ड्रामा बायोपिक आहे, ज्यामध्ये ते प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहेत. अशा विविध आणि सखोल कथा निवडून विक्रांत मॅसी आजच्या सिनेसृष्टीत बहुपर्यायी प्रतिभा आणि दर्जेदार अभिनयाला एक नवी दिशा देत आहेत.