
फोटो सौजन्य - Social Media
John Cena ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आशा भोसले यांचा गातानाचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. John Cena च्या या पोस्टखाली त्याच्या भारतीय चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली आहे तसेच अनेक भारतीय कलाकारांनी तसेच सिताऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. फक्त John Cena च नव्हे तर जगभरातील इतर अनेक काही नावाजलेल्या व्यक्तींनी आशाताईंना आदरांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Brett Lee नेही आशा भोसलेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Brett Lee आशा भोसलेंच्या ‘haan main tumhara hoon’ या गाण्यात झळकला होता, त्याची आठवण करत त्याने आशाताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे की,”Asha Bhosle यांच्यासोबत 2006 साली ‘You’re the One for Me’ हे गाणं लिहिण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचा अनुभव मिळाला. आशाताईंनी एवढे यश मिळवले तरीही त्यांच्या माणुसकी अफाट होती, त्यांचा नम्र स्वभाव नेहमी मनाला भावतो.” त्यांच्या कार्याचा आणि वारशाचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहील, असा विश्वास Brett Lee ने व्यक्त केला.
British संगीतकार Boy Geroge ने आशाताईंची खास पोस्ट शेअर केली आहे. आशाताईंचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने नमूद केले आहे की, “Asha Bhosle यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो! ‘Bow Down Mister’ या गाण्यातील त्यांच्या शानदार आवाजाची आठवण कायम राहील. यांचा आवाज जणू रेशमासारखा मऊ आणि मधुर होता.” या पोस्टखाली अनेक आंतरराष्ट्रीय संगीतकार तसेच सिनेक्षेत्रातील कलाकारांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली आहे.