Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली! सरकारने थेट बजावली नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या 'जिओ न्यूज'ला पाकिस्तान सरकारने नोटीस बजावली आहे. भारतीय कंटेंट दाखवल्याचा ठपका ठेवत 'पेमरा'ने ही कारवाई केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 13, 2026 | 09:10 PM
Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली! (Photo Credit- X)

Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली!
  • सरकारने थेट बजावली नोटीस
  • काय आहे नेमके प्रकरण?
भारताची गानकोकिळा आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण जग त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. मात्र, सीमेपलीकडे पाकिस्तानात आशाताईंना श्रद्धांजली वाहणे तेथील एका प्रमुख न्यूज चॅनेलला महागात पडले आहे. आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित कार्यक्रम प्रक्षेपित केल्यामुळे पाकिस्तान सरकारने संबंधित चॅनेलवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला

पाकिस्तानची इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक संस्था ‘पेमरा’ (PEMRA) ने देशातील अग्रगण्य वृत्तवाहिनी ‘जिओ न्यूज’ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देताना जिओ न्यूजने भारतीय गाण्यांचे आणि चित्रपटांचे काही भाग (व्हिज्युअल्स) दाखवले होते. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय आशय (Indian Content) प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पेमराने चॅनेलला नोटीस धाडली असून, हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे म्हटले आहे.

कलावंतांना सीमेत बांधणे चुकीचे: अझहर अब्बास

जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी या कारवाईवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “जेव्हा एखाद्या महान कलाकाराचे निधन होते, तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची जुनी परंपरा आहे. आशा भोसले यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या गायिकेला आदरांजली वाहताना त्यांची सदाबहार गाणी दाखवणे हा पत्रकारीतेचा आणि कलेचा भाग आहे.”

Asha Bhosle Funeral: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप

अब्बास यांनी पुढे स्पष्ट केले की, कला आणि ज्ञान ही संपूर्ण मानवजातीची सामायिक वारसा आहे, त्यांना भौगोलिक सीमांमध्ये अडकवणे चुकीचे आहे. त्यांनी आठवण करून दिली की, आशाताई या पाकिस्तानच्या गानसम्राज्ञी नूरजहाँ यांच्या मोठ्या चाहत्या होत्या आणि त्यांना ‘मोठी बहीण’ मानत असत. तसेच नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतचे त्यांचे गाजलेले अल्बम्स आजही लोकप्रिय आहेत. युद्ध किंवा तणावाच्या काळात कलेचा बळी दिला जाऊ नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पाकिस्तानी पत्रकारांकडूनही निषेध

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार रऊफ क्लासरा यांनीही या सरकारी कारवाईचा निषेध केला आहे. “एका महान गायिकेच्या कारकिर्दीवर आधारित बातम्या दाखवल्याबद्दल नोटीस बजावणे संतापजनक आहे. आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने अखंड उपखंडातील अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे. त्या आदराच्या आणि सन्मानाच्या हक्कदार आहेत,” असे क्लासरा यांनी म्हटले आहे.

आशाताईंच्या स्मृतींना शासन मानवंदना देणार! मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची संगीत संस्था; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Web Title: Pakistan media regulatory authority notice geo news asha bhonsle tribute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.