सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याला ३१ व्या वर्षीच आला हृदयविकाराचा झटका
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक सेलिब्रिटींना फार कमी वयात हृदयविकाराचा झटका येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठमोळा बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेलाही हृदयविकाराचा झटका आला होता. अशातच आता त्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहिसन खान यालाही फार कमी वयात हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती अभिनेत्याने एका मुलाखतीतून दिली आहे.
मोहिसन खानने मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला हृदयविकाराचा सौम्य झटका वर्षभरापूर्वी आला होता. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर तो वर्षभर प्रचंड आजारीच होता, असं त्याने सांगितले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचा त्याने कोणालाही सांगितले नव्हते. त्याने पुढे मुलाखतीत सांगितले की, “सध्या मी पूर्णपणे बरा आहे. मला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. पण मी याबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. दरम्यान त्या काळात मला अनेक हॉस्पिटल बदलावे लागले होते.”
मोहसिन खानला हृदयविकाराचा झटका कसा आला ?
“मी कोणतेही व्यसन करत नसतानाही मला फॅटी लिव्हर झाले होते. कोणतेही व्यसन न करता होणाऱ्या आजाराला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. कदाचित मला हृदयविकाराचा झटका अपुऱ्या झोपेमुळे आला असावा. शिवाय, यामुळे माझ्या रोगप्रतिकारक शक्तीवरही फार मोठा परिणम झाला होता. मी वारंवार आजारी पडत होतो.” गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम गौरी खान हिलाही तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले होते. सध्या अभिनेत्री संबंधित आजारावर उपचार घेत आहे.
हे देखील वाचा – साऊथ स्टार विजय थलपथीची राजकारणात एन्ट्री, राजकीय पक्षाचा झेंडा आणि अँथम लाँच!
मालिकेमध्ये मोहसिन खानने कार्तिकची भूमिका साकारली आहे. मोहसिन खान शिवांगी जोशीसोबत मुख्य भूमिकेत होता. तर, शिवांगीने मालिकेत नायराचे पात्र साकारले होते. या मालिकेतूनच मोहसिनला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.