(फोटो सौजन्य- Social Media)
यशराज बॅनरखाली बनलेल्या राणी मुखर्जी स्टारर मर्दानी चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणीने आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे. या फ्रँचायझीचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत आणि दोन्ही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. 22 ऑगस्ट म्हणजेच आज मर्दानीची 10 वा वर्धापनदिन आहे. या खास प्रसंगी, निर्मात्यांनी मर्दानी फ्रँचायझी पुढे नेण्याची घोषणा केली आहे आणि चाहत्यांना मर्दानी चॅप्टर 3 ची आनंदाची बातमी दिली आहे.
मर्दानी चॅप्टर 3 केला जाहीर
मर्दानी 22 ऑगस्ट 2014 रोजी यशराज फिल्म्स प्रॉडक्शनने रिलीज केला होता. राणी मुखर्जी खाकी वर्दी परिधान करून महिलांवर अत्याचार करणाऱ्या क्रूरांना आणि व्यवस्थेशी खेळणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवताना दिसली. यानंतर 2019 मध्ये मर्दानीचा दुसरा भाग मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्येही अभिनेत्रीने दमदार एन्ट्री घेतली आणि तिच्या अभिनयाने चाहत्यांचे मने जिंकली. प्रेक्षकांना या चित्रपटाचा दुसरा भाग देखील भरपूर आवडला होता. आता येणाऱ्या तिसऱ्या भागात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मर्दानीच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त, निर्मात्यांनी असे जाहीर केले आहे की, येत्या काळात तुम्हाला ‘मर्दानी चॅप्टर 3’ या चित्रपटात राणी मुखर्जीची ज्वलंत वृत्ती पाहायला मिळणार आहे.
10 years of #Mardaani and the next chapter awaits… Celebrating the feisty, daredevil cop #ShivaniShivajiRoy and the spirit of #Mardaani today. Thank you for a decade of love and appreciation for our beloved franchise.
We are inspired… again… thanks to you. #RaniMukerji pic.twitter.com/jJlAp3VAAQ— Yash Raj Films (@yrf) August 22, 2024
या घोषणेनंतर राणीच्या चाहत्यांची उत्कंठा खूप वाढली आहे आणि ती लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर परतताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेत्री शेवटची 2022 मध्ये मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटात दिसली होती. आणि आता ती लवकरच ‘मर्दानी चॅप्टर 3’ मध्ये दिसणार आहे.
हे देखील वाचा- साऊथ स्टार विजय थलपथीची राजकारणात एन्ट्री, राजकीय पक्षाचा झेंडा आणि अँथम लाँच!
बॉक्स ऑफिसवर मर्दानीची कामगिरी कशी होती?
बॉलीवूड हंगामाच्या अहवालावर आधारित, मर्दानी पार्ट-1 ने बॉक्स ऑफिसवर 35.82 कोटी रुपयांचे उत्तम कलेक्शन केले आणि हिटचा किताब मिळवला. यानंतर मर्दानी-2 ने कमाईच्या बाबतीतही लाट आणली आणि 2019 मध्ये 47.57 कोटी रुपयांचा व्यवसाय करून यशाची पायरी पार केली. आता ‘मर्दानी चॅप्टर 3’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार ही उत्कंठाची बाब ठरणार आहे.