(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी आज, गुरुवारी आपल्या पक्षाच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे आणि चिन्हाचे अधिकृतपणे अनावरण केले. टीव्हीके ध्वज आणि निवडणूक चिन्हाच्या अनावरणाच्या वेळी विजयचे वडील आणि आई देखील पक्ष कार्यालयात उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
यावेळी विजय म्हणाला की, “मला माहित आहे की तुम्ही सर्व आमच्या पहिल्या राज्य परिषदेची वाट पाहत आहात. त्यासाठी तयारी सुरू असून लवकरच मी त्याची घोषणा करेन. त्याआधी आज मी आपल्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले आहे. मला खूप अभिमान वाटतो आहे. तामिळनाडूच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू.” असं अभिनेत्याने लोकांना सांगितले.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Actor and Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay unveils the party’s flag and symbol today.
(Source: ANI/TVK) pic.twitter.com/J2nk2aRmsR
— ANI (@ANI) August 22, 2024
पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यापूर्वी अभिनेते-राजकारणी विजय यांनी शपथ वाचून दाखवली. सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व ते पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शपथपत्रात विजयने लिहिले की, ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले आणि बलिदान दिले त्या सैनिकांचे मला नेहमीच कौतुक वाटेल. तमिळ भूमीतील आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढणाऱ्या त्या अगणित सैनिकांचे योगदान आम्ही सदैव लक्षात ठेवू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावरचा भेदभाव मी दूर करेल. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करेल आणि सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील. मी शपथ घेतो की मी सर्व प्राणिमात्रांसाठी समानतेचे तत्व कायम ठेवीन.’ अशी शपथ घेऊन विजयने लोकांना खुश करून टाकले.
याचदरम्यान बुधवारी, तामिळमध्ये जारी केलेल्या एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, अभिनेत्याने सांगितले की लोकांसाठी काम करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. रोज नवी दिशा आणि नव्या ताकदीने काम करायचे असेल तर ते खूप मोठे योगदान आहे. 22 ऑगस्ट 2024 हा दिवस आहे जो देव आणि निसर्गाने आपल्याला आशीर्वाद म्हणून दिला आहे. याच दिवशी आम्ही तामिळनाडू विजय क्लबचे मुख्य प्रतीक असलेल्या ध्वजाची ओळख लोकांना करिन देत आहोत.” असं अभिनेत्याने सांगितले.
हे देखील वाचा- चाहतीने केला हेमा मालिनीला स्पर्श अभिनेत्रीने ढकलला हात, युजर्स म्हणाले “जया आणि ही एकसारखेच”
तामिळनाडूच्या कल्याणासाठी काम करताना आम्ही आमचा वीर ध्वज, विजय ध्वज आमच्या मुख्यालय सचिवालयात सादर करू, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, ‘ते आपल्या राज्याचे प्रतीक बनेल. ध्वजगीतेही आम्ही प्रसिद्ध करू. त्याचा ध्वजही आम्ही फडकवू, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.’ असं देखील विजय म्हणाला आहे. अभिनेता विजयने अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने आपल्या पक्षाचे नाव तमिलगा वेत्री कझगम ठेवले आहे.