(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ ने एक नवीन इतिहास रचला आहे. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकून जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे.झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मोठ्या LED स्क्रीनवर झळकत असल्याचे स्पष्टपणे दिसते.हा एक प्रथमच घडलेला प्रकार आहे जिथे एखाद्या मराठी मालिकेचा प्रोमो टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आला आहे. झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले यांच्याद्वारे साकारलेल्या भूमिका विशेष गाजत आहेत.‘कमळी’ या पात्राने ग्रामीण जीवनातील संघर्ष, स्वाभिमान आणि स्वप्नं या सर्व भावना प्रभावीपणे सादर केल्या आहेत.
वाहिनीने हा व्हिडीओ शेअर करीत त्याला खास कॅप्शनही दिली आहे. मालिकेच्या या व्हिडीओखाली ”कमळीने रचला इतिहास! मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका मालिकेचा प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केअवर झळकवण्यात आला आहे” असं कॅप्शन देत ही पोस्ट करण्यात आली आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीसुद्धा कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.
धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर एका तरी मराठी मालिकेचा प्रोमो झळकताना पाहायला मिळत आहे. कमळी ही मालिका जून महिन्यात सुरू झाली होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेत कमळी आणि अनिका या दोघी कबड्डीच्या स्पर्धेसाठी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता मालिकेत अपहरण, सुटका, आणि शौर्य यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो आहे. कमळीचं अपहरण झाल्यानंतर ती स्वत:ची सुटका कशी करते आणि स्पर्धैच्या ठिकाणी कशी पोहोचते तसेच तारीणी कमळीला यातून कसं सोडवते आणि कमळी या स्पर्धेत बाजी मारणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.