(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मनोरंजन विश्वातून एक दुःखत बातमी समोर आली आहे. ज्यामुळे सगळेच चकीत झाले आहेत. बालकलाकार आणि त्याच्या भावांचं निधन झालं आहे. शॉर्ट सक्रिट होऊन घरात गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका अभिनेत्रीने आपल्या दोन्ही मुलांना गमावलं आहे. ज्यामुळे तिला खूप मोठ्या धक्का बसला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि ही कोणत्या अभिनेत्रीचे मुलं आहेत जाणून घेऊयात.
“काल करूरमध्ये जे काय घडले…” रॅलीमधील झालेल्या घटनेवर विजय थलापथी भावुक; शेअर केली पोस्ट
कोटाच्या अनंतपुरा पोलिस स्टेशन परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरमधील दीपश्री अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. फ्लॅटमध्ये आग लागल्यानं आणि धुरामुळे गुदमरून दोन निष्पाप भावांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. मृतांची ओळख शौर्य शर्मा वय वर्ष १५ आणि वीर शर्मा वय वर्ष १० अशी आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही मुलं फ्लॅटमध्ये एकटीच होती. आणि या दोघांनाचा हा अपघाती मृत्यूमुळे सगळ्यांचा धक्का बसला आहे.
हा अपघात पहाटे २ वाजताच्या सुमारास घडला
अनंतपुरा पोलिस स्टेशनचे अधिकारी भूपेंद्र सिंग यांनी सांगितले की, शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. फ्लॅट क्रमांक बी-४०३ मध्ये आग लागली, त्यामुळे संपूर्ण घरभर आग पसरली. मुलं घरात झोपलेली असल्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. मृत मुलांचे वडील जितेंद्र शर्मा हे कोटा येथील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी मेंबर असून आई रिटा शर्मा अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने मिस बल्गेरियाचा किताब देखील जिंकला आहे. ती मुंबईत टीव्ही मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग करत होती. अपघाताच्या वेळी वडीलही काही कामानिमित्त बाहेर होते. मुलं घरी एकटीच होती, त्यामुळे त्यांना वेळेत बाहेर काढता आलं नाही.
महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
शेजाऱ्यांनी ताबडतोब दिली माहिती
जेव्हा धुराचा वास आणि दुर्गंधी अपार्टमेंटमध्ये पसरू लागली तेव्हा शेजाऱ्यांनी दार वाजवले आणि नंतर वडिलांना फोन करून माहिती दिली. मुलांना ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, पण, डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केलं. १० वर्षांचा वीर शर्मा हा एक नवोदित बाल कलाकार होता आणि त्यानं ‘वीर हनुमान’ या लोकप्रिय मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारली होती.
पोस्टमार्टमसाठी मृतदेह ठेवण्यात आले आहेत
दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेडिकल कॉलेजच्या नवीन रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण कोटा शहर हादरून गेलं आहे.