मालिकेचा प्रोमो नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोनुसार, आर्याच्या भूमिकेचं नाव अनामिका असं आहे. अन्नपुर्णा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक मुलगी कारमधून उतरते. ती कॉलेजमध्ये येत असताना सगळे तिच्याकडे पाहू लागतात. विद्यार्थ्यांमधलं एक जण म्हणतं की, या खूप छान गातात. त्यानंतर आर्या म्हणजेच अनामिका ऋषीसमोर येते आणि ऋषीला म्हणते की, आवडली ना मी ? त्यावर ऋषी काय बोलावं ते कळत नाही. तेव्हा अनामिक म्हणते की, अरे मी फक्त या कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायला आले नाही तर लग्नासाठी मुलगा देखील बघायला आले आहे. अनामिका त्यांनतर ऋषीला घेऊन धरत कॉलेजबाहेर येते.
सध्या या प्रोमोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
अनामिकाच्या या एन्ट्रीने मालिकेत नवा ट्विस्ट येणार हे नक्की. खरंतर ऋषीचं कमळीवर प्रेम असतं आणि बरेच दिवस तो कमळीला हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही. तेच दुरीकडे ऋषीवर अनिकाचं प्रेम असतं. काहीही करुन अनिका ऋषी आणि कमळीला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ऋषी अनिकाच्या प्रेमाला काडीचा देखील प्रतिसाद देत नाही. एकीकडे अनिकाचं ऋषीवर प्रेम तर दुसरीकडे अनामिकाची ऋषीच्या आयुष्यात झालेली एन्ट्री यामुळे ऋषीला कमळीला त्याच्या मनातलं सांगू शकेल का ? मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार हे पाहणं विशेष ठरणार आहे.
एकंदितच आता आर्याच्या येण्याने कमळी आणि ऋषीच्या नात्यावर काय परिणाम होणार ? हे येत्या काही दिवसात कळेलच. पण आर्याच्या एन्ट्रीने नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत सांगितलं की,. ” हे खूपचअनेपेक्षित आहे”, “धक्कादायक द्विस्ट”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.






