आजकालचं गुंतागुंतीचं जीवन, येणारा ताण आणि सतत काही ना काहीतरी चिंता यामुळे अनेक महिलांना डिप्रेशनला सामोरे जावे लागते. कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या
नैराश्याने ग्रस्त असलेल्या महिलांना अनेकदा सतत दुःख आणि रडण्याची इच्छा होते. जरी याची काही कारणे असू शकतात. ही स्थिती अनेक आठवडे टिकते
अशा परिस्थितीत, महिलांना नेहमीच थकवा जाणवतो, जरी त्यांनी जास्त काम केले नसले तरीही त्यांना उर्जेचा अभाव आणि थकवा जाणवतो
नैराश्याने ग्रस्त असलेल्या महिलांना अनेकदा आपला दर्जा कमी आहे अथवा आपण अयशस्वी किंवा दोषी असल्यासारखे वाटते. तिला तिच्या आयुष्यातील निर्णयांचा सतत पश्चात्ताप होत राहतो
अनेकदा नैराश्यात झोपेची समस्या उद्भवू शकते. काही महिलांना अजिबात झोप येत नाही किंवा काहींना जास्त झोप येते
याशिवाय महिला सतत अतिविचार करत असतील आणि त्यातून त्यांना सतत त्रास होत असेल तर हेदेखील एक नैराश्याचे लक्षण आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही