लसणाने येईल चेहऱ्यावर ग्लो (फोटो सौजन्य: iStcok)
कच्चा लसूण खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. लसणाचा वापर अनेक घरगुती उपचारांमध्येही केला जातो. तसेच तासून आपल्या जेवणाची सुद्धा चव वाढवत असतो.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की लसूण खाल्ल्याने त्वचा सुंदर बनते. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लसणात अनेक जैविक गुणधर्म आढळतात. हे खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारे घटक वाढतात.
लसणातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स रोखण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतील पिंपल्समधील बॅक्टेरिया देखील थांबू शकते.
लसूण त्वचेच्या जळजळीपासून देखील आराम देते. लसणातील अँटीफंगल गुणधर्म रक्त शुद्ध करतात, ज्यामुळे त्वचेला चमक येते.
लसणातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात आणि कोरडेपणाची समस्या टाळतात. दररोज 1 लसूण लसूण खाल्ल्याने त्वचा मुलायम होते.