संजू सॅमसनच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीवर टाका नजर. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन. संजू सॅमसनने 50 चेंडूत 107 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
आता या डावातील संजू सॅमसनने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांचेही विक्रम मोडीत निघाले आहेत. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
संजू सॅमसन भारतासाठी T20 सामन्यांच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला आहे. याआधी रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकार ठोकले होते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
संजू सॅमसन हा T20 डावात 10 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा 19 वा खेळाडू ठरला आहे. T20 फॉरमॅटच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एस्टोनियन साहिल चौहान पहिल्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संजू सॅमसनने तिसऱ्यांदा पन्नास धावांचा टप्पा पार केला. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो तिसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
संजू सॅमसनचे T20 क्रिकेटमधील हे सलग दुसरे शतक आहे. याआधी संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. अशाप्रकारे, संजू सॅमसन T20 इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया