Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs OMA: संजू सॅमसनची धमाकेदार खेळी! ओमानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ओमानसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 19, 2025 | 09:55 PM
IND vs OMA (Photo Credit- X)

IND vs OMA (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजू सॅमसनची धमाकेदार खेळी!
  • ओमानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान
  • भारतीय संघाचा ऐतिहासिक विक्रम!

IND vs OMA, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ मधील शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघ ओमान सोबत भिडत आहे. हा सामना अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ओमानसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

A big total for India against an inexperienced Oman side 💪#INDvOMA LIVE ▶️ https://t.co/AMBIZU5uoM pic.twitter.com/j7d3xAGpS5 — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 19, 2025

संजू सॅमसनची अर्धशतकी खेळी

या रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली, कारण सलामीवीर शुभमन गिल अवघ्या ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी संघाला सावरले. यामध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची शानदार खेळी केली. त्याने ४५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. संजू सॅमसनशिवाय अभिषेक शर्माने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ओमानची प्रभावी गोलंदाजी

ओमानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. शाह फैसलने शुभमन गिलला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. ओमानकडून जितेन रामानंदी, शाह फैसल आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. विजयासाठी ओमानला २० षटकांत १८९ धावांची गरज आहे.

Suryakumar Yadav: हिटमॅनचा प्रभाव! कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं, म्हणाला- ‘मी रोहितसारखा झालोय…’

भारतीय संघाचा ऐतिहासिक विक्रम!

आजच्या ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठा पराक्रम करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० सामने पूर्ण केले आहेत. भारतीय संघ ही ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातील दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी केवळ पाकिस्तानने २५० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळले आहेत. २००६ मध्ये आपला पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियाने आतापर्यंत २५० सामने खेळले आहेत. यातील १६६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर ७१ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सहा सामने बरोबरीत (टाय) सुटले आहेत, तर सहा सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. भारत हा जगातील एकमेव असा संघ आहे, ज्याचा टी-२० मध्ये आतापर्यंत ज्या संघांविरुद्ध सामना झाला आहे, त्या प्रत्येक संघाविरुद्ध त्याचा विजय दर (Win Percentage) ५०% पेक्षा जास्त आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी

Web Title: Sanju samsons explosive innings oman need 189 runs to win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND vs OMA
  • Sanju Samson
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी
2

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
3

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर
4

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.