अदिती राव हैदरीने सप्टेंबर महिन्यात दुसरं लग्न केलं होतं. पण आता तिने पुन्हा एकदा लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पुन्हा एकदा अदिती आणि सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत.
Aditi Rao Hydari Siddharth Romantic Photoshoot
अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्याच्या जोरावर आपलेसे केले आहे.
कायमच आपल्या फॅशनच्या जोरावर चर्चेत राहणाऱ्या आदितीने इन्स्टाग्रामवर पती सिद्धार्थसोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे. त्यांच्या नव्या रोमँटिक फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
आदितीने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच हे नवीन फोटोशूट शेअर केलेले आहेत. दोघांच्याही खास लूकची सध्या जोरदार चर्चा होत असून फॅशनची ही कमालीची चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये आदितीने व्हाईट अँड ब्लॅक कलरचा स्टायलिश घागरा वेअर केला असून तिने त्यावर लुकला साजेसा मेकअपही केलेला आहे.
दरम्यान अभिनेत्रीने ब्रँडेड ज्वेलरी कॅरी करत सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक सुंदर फोटो पोजेस देत स्टायलिश फोटोज शेअर केलेले आहेत.
तर सिद्धार्थच्या लूकबद्दल बोलायचे तर, त्याने ब्लॅक कलरचा कुर्ता, कोट आणि पँट वेअर करत त्यानेही खूप सुंदर फोटोशूट केले आहेत.
फोटोंमध्ये अदिती आणि सिद्धार्थ दोघेही खूपच सुंदर दिसत असून दोघांच्याही रोमँटिक पोजेसने लक्ष वेधले आहेत. दोघांच्याही फोटोंची पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात विवाह केला. हा विवाह सोहळा खूप खास आणि खासगी स्वरुपाचा होता. या विवाहसोहळ्यात मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.
"लग जा गले की फीर ये..." आदिती राव आणि सिद्धार्थचं रोमँटिक फोटोशूट