मासे खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
मासे खाल्ल्यानंतर दही, दूध, ताक किंवा चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडून आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होतात.
काहींना मासे खाल्ल्यानंतर पोटदुखी, अस्वस्थता, गॅस आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवतात, कारण माशांसोबत पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.
विटामिन सी आणि आंबट फळांचे सेवन माशांसोबत अजिबात करू नये. यामुळे शरीरात आम्ल्पित्त वाढते आणि अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होऊन आरोग्य बिघडू लागते.
हिरव्या पालेभाज्या, पालक किंवा कोथिंबीर इत्यादी भाज्या माश्यांसोबत अजिबात खाऊ नये. कारण मासे आणि भाज्यांमध्ये असलेले घटक एकत्र होऊन शरीरावर गंभीर परिणाम करतात.
मासे किंवा चिकन खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नये. यामुळे शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढते. तसेच माशांसोबत अल्कोहोल किंवा वाईन पिण्याची सवय अतिशय चुकीची आहे.