भूक लागल्यानंतर बिस्किटांऐवजी करा 'या' हेल्दी स्नॅक्सचे सेवन
ऑफिसच्या वेळेत भूक लागल्यानंतर सफरचंद, केळी, पेरू, इत्यादी हंगामी फळांचे सेवन करावे फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दैनंदिन आहारात नियमित फळे खावीत.
आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी कच्च्या भाज्या खाणे अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात आणि ऑफिसमध्ये भूक लागल्यानंतर तुम्ही भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील.
भूक लागल्यानंतर चिया सीड्स तुम्ही दूध किंवा दह्यात भिजवून खाऊ शकता. तसेच या पुडिंगमध्ये ताजी फळे टाकल्यास पुडिंगची चव आणखीनच सुंदर लागेल.
आरोग्यासाठी ग्रीक दही अतिशय पौष्टिक आहे. या दह्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच या दह्यात तुम्ही ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा रास्पबेरीबी इत्यादी फळे टाकून खाऊ शकता.
भूक लागल्यानंतर काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके किंवा पिस्ता खावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. काम करण्याचा उत्साह वाढतो.