रायगड जिल्ह्यातील शहरे आणि गावे बर्फाने अच्छादित झाल्यासारखे दिसणारे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. '
'काश्मीर नाही अलिबाग’, ‘स्नो फॉल इन पाली’ 'रायगड हिमाच्छादित' असे कॅप्शन देत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये स्थानिक शहरे व गावे जाड बर्फाच्या आवरणाने झाकली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय बर्फ पडतानाही दिसत आहे.
वास्तवात रायगड जिल्ह्यात कुठेही अशी बर्फवृष्टी होत नसली, तरी AI च्या मदतीने कल्पनेच्या जगात हे दृश्य साकारण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओना नेटकऱ्यांना चांगलीच पसंती दिली आहे.
शहरातील सर्व ठिकाणे, दुकाने, इमारती, मंदिर, मुख्यालयाचे ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रस्ते व माणसे आदी जशीच्या तशी त्यामध्ये दिसत आहेत.