
पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या 'या' ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर... Video Viral
दरम्यान चित्रपटात दाखवण्यात आलेले रहमान डकैतचे भव्य घर नक्की कुठे शूट करण्यात आले आहे हे समोर आले आहे. अनेक प्रमुख दृश्ये पंजाब आणि चंदीगडमध्ये चित्रित करण्यात आली आहेत. विशेषतः, कराचीच्या ल्यारी भागात चित्रित केलेले रहमान डकैतचे घर प्रत्यक्षात अमृतसरमधील ऐतिहासिक लाल कोठी येथे चित्रित करण्यात आले आहे. लाल कोठी त्याच्या जुन्या वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जाते. हे स्थान चित्रपटाच्या कथेत भर घालते, ते आणखी प्रभावी बनवते. प्रेक्षकांना पाकिस्तानची मालकी असलेली ही हवेली प्रत्यक्षात भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे.
शूटिंगसाठी किती पैसे आकारण्यात आले?
माहितीनुसार, लाल कोठीमध्ये धुरंधर चित्रपटाचे दोन दिवस शूटिग चालले. या ऐतिहासिक इमारतीत शूटिंग करण्यासाठी रोजचे ५०,००० रुपये आकारण्यात आले. दरम्यान ही कोठी कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या मालकीची नाही, तर एका ट्रस्टद्वारे चालवली जाते. इंस्टाग्रामवर लाल कोठीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला ही वास्तू जवळून पाहता येते. व्हिडिओत चित्रपटात शूट झालेले सीन्स लाल कोठीमधील कोणत्या भागात शूट करण्यात आलेत तेही स्पष्ट दाखवण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रेहमानसाठी हे घर सजवणे हा एक मोठा आशीर्वाद होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संपूर्ण सेटअप अजूनही तिथे आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नवीन पर्यटन स्थळ”.
खऱ्या आयुष्यातील खलनायक
चित्रपटात अक्षय खन्ना यांनी साकारलेला रहमान डकैत हा खऱ्या आयुष्यातला पाकिस्तानी गुंड होता. चित्रपटानुसार, तो २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संजय दत्त यांनी साकारलेल्या पाकिस्तानी पोलिस अधिकारी चौधरी अस्लम यांनी त्याला चकमकीत मारले होते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.