अजित पवार कायमच पांढऱ्या रंगाचे कपडे का परिधान करायचे? दादांच्या लुकची सगळीकडेच होती चर्चा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते कायमच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे.
अजित पवार कायमच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. कडक इस्त्री केलेला कुर्ता, पायजमामधील लुक कायमच रुबाबदार दिसायचा. त्यांच्या पांढऱ्या कुर्त्यामधील लुकची सगळीकडे मोठी चर्चा असायची.
सुती पांढरा कुर्ता आणि पायजमा परिधान करत होते. यामागे त्यांचा साधेपणा स्वच्छता, आणि भारतीय राजकारणातील पारंपारिक वारसा ही काही मुख्य कारण होती. पांढरा रंग शांतता आणि स्वच्छ प्रतिमेचे प्रतीक मानला जातो.
गांधीजींच्या काळापासून भारतीय राजकारणी खादीपासून बनवलेले पांढरे कपडे परिधान करत असे. पांढऱ्या रंगाचे कपडे साधेपणाशी जोडले जातात, त्याप्रमाणे अजित दादासुद्धा सामान्य लोकांशी जोडलेले होते.
अजित पवार यांच्या जाण्यामुळे संपूर्ण पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांच्या जाण्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.