Alka Kubal Daughter Engagement: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अलका कुबल यांच्या घरी आनंदाची बातमी! मराठी मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ, आवडत्या अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका कुबल आता मुलीच्या आयुष्यातल्या एका खास क्षणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या धाकट्या मुलीचा, डॉ. कस्तुरी आठल्येचा नुकताच संकेत दुधाळ यांच्यासोबत मोठ्या थाटात साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
आईकडून मुलीला शुभेच्छा अलका कुबल यांनी स्वतः सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे छान फोटो टाकत मुलगी कस्तुरी आणि होणारे जावई संकेत यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातल्या बऱ्याच कलाकारांनी पण शुभेच्छांचा वर्षाव केलाय. कस्तुरी आणि संकेत यांचा एकत्र फोटो टाकत त्यांनी दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं की, "तुमच्या दोघांनाही आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकमेकांची साथ मिळो, हीच शुभेच्छा. तुमच्या साखरपुड्याबद्दल तुमचं अभिनंदन!"
लाल साडीत कस्तुरीचा सुंदर लूक या खास प्रसंगी कस्तुरीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. पारंपरिक दागिने, गळ्यातला हार, कमरपट्टा आणि नथ अशा दागिन्यांनी तिचा लूक आणखीनच खुलून दिसत होता. पारंपरिक कपड्यांमध्ये कस्तुरी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या साखरपुड्यातले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
कस्तुरी आठल्ये कोण? मीडिया रिपोर्टनुसार, अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्या दोन्ही मुली मनोरंजन विश्वापासून लांब आहेत. त्यांची मोठी मुलगी ईशानी ही वैमानिक आहे. तर धाकटी मुलगी कस्तुरी हिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर केलंय. तिने फिलिपिन्समध्ये MBBS चं शिक्षण पूर्ण केलंय. अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी हिचा लग्न सोहळा २०२२ मध्ये मोठ्या थाटात पार पडला होता.
संकेत दुधाळ कोण? कस्तुरीचे होणारे पती संकेत दुधाळ यांच्याबद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. पण साखरपुड्याच्या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच छान दिसतेय. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय. कुटुंबातील सगळ्यांनी या नात्याला मनापासून पसंती दिली आहे.
आठल्ये कुटुंबात आनंदाचं वातावरण आता धाकटी मुलगी कस्तुरीचा संकेत दुधाळ यांच्यासोबत साखरपुडा झाल्याने आठल्ये कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मोठ्या मुलीच्या लग्नानंतर आता धाकट्या मुलीच्या साखरपुड्यामुळे घरात परत एकदा आनंदाचे क्षण आलेत. दोन्ही कुटुंबांनी मिळून हा सोहळा खूप छान साजरा केला.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव कस्तुरी आणि संकेत यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छांचा पाऊस पाडलाय. लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख पण समोर येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. सध्या तरी या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होतायत.