उन्हाळ्यात नियमित करा वाटीभर दह्याचे सेवन, शरीरासह आरोग्याला होतील अद्भुत फायदे
वाढलेल्या उष्णतेमुळे काहीवेळा पोटात जळजळ होऊ लागते. पोटात जळजळ वाढल्यानंतर अनेकदा अस्वथ वाटू लागते. त्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवल्यास दही खावे.
रात्रीच्या वेळी किंवा फळांसोबत चुकूनही दह्याचे सेवन करू नये. मात्र दही आणि फळाचे एकत्र सेवन केल्यास त्यात काळे मीठ किंवा जिऱ्याची पावडर मिक्स करून खावे.
हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाड दुखणे, बसताना किंवा वर उठताना अनेक वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी दह्याचे सेवन करावे.
दह्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. दह्यामध्ये आढळून येणारे सूक्ष्मजीव शरीरात वाढलेले पित्त कमी करतात. त्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यास वाटीभर दही खावे.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक प्रोटीन पावडरचे सेवन करण्याऐवजी दही किंवा ताक प्यावे. सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारच्या आहारात दही, ताकाचे सेवन करावे.