कोणत्याही साडीवर उठून दिसतील 'या' रंगाचे आकर्षक ब्लाऊज
काठपदर, पैठणी किंवा कांजीवरम साडीसह सर्वच साड्यांवर सोनेरी रंगाचा ब्लाऊज अतिशय उठावदार दिसेल. सोनेरी रंगाचा ब्लाऊज शिवताना त्यावर तुम्ही आरी वर्क किंवा लेस वर्क सुद्धा करून घेऊ शकता.
हल्ली सर्वच महिला कॉटनची साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. कॉटनच्या साडीवर प्रामुख्याने पांढऱ्या किंवा साडीला मॅच होईल असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला जातो.
काळ्या रंगाचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदरच दिसतो. त्यामुळे तुमच्या कपाटात एकतरी काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज असायला हवा. काळ्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
कोणत्याही डिझायनर साडीवर तुम्ही चंदेरी ब्लाऊज घालू शकता. चंदेरी ब्लाऊजच्या अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत.
सध्या ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाऊज सोशल मीडियावर ट्रेडींगला आहे. कोणत्याही डार्क रंगाची साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.