सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरी बनवा चविष्ट गुलाब श्रीखंड
सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. जिलेबी, मिठाई, शेवयांची खीर इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या आधी घरात फराळातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लाडू, करंजी,चकली, शंकरपाळी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच बाहेरून विकत आणलेली मिठाई किंवा गोड पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थाचे सेवन करावे. कारण सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारातील पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते., भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गुलाब श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो.(फोटो सौजन्य: Pinterest)