दिवाळी सणाला पारंपरिक लुक हवा असेल तर 'या' डिझाईनचे Invisible Neckless नक्की करा ट्राय
इनव्हिजिबल नेकलेसला फ्लोटींग पेंडेंट नेकलेस किवा व्हायरल वायर नेकलेस असे सुद्धा म्हणतात. या नेकलेसची खासियत म्हणजे दागिना बनवण्यासाठी वापरली जाणारी अतिशय पातळ तार. त्यामुळे साडी किंवा ड्रेसवर घालण्यासाठी तुम्ही या डिझाईनचे नेकलेस खरेदी करू शकता.
साऊथ इंडियन महिलांच्या गळ्यात प्रामुख्याने लक्ष्मीची पेन्डन्ट पाहायला मिळतात. त्यामुळे या डिझाईनचे इनव्हिजिबल नेकलेस तुम्ही बनवून घेऊ शकता.
सोशल मीडियावर कमळाच्या पेन्टन्टचे इनव्हिजिबल नेकलेस मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे थोडासा ग्लॅमर आणि स्टायलिश लुक दिसेल.
ऑफिसमध्ये कोणत्याही कार्यक्रमात कॉटनच्या साडीवर नेमके कशाप्रकारचे दागिने घालावे, बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. अशावेळी तुम्ही नाजूक साजूक मण्यांचे इनव्हिजिबल नेकलेस परिधान करू शकता.
काठपदर किंवा पैठणी साडी परिधान केल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनचे इनव्हिजिबल नेकलेस परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक मॉर्डन आणि पारंपरिक दिसेल.