Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: दिवाळीपूर्वी तुम्ही घर रंगवण्याचा विचार करत आहात का? वास्तुनुसार निवडा ‘हे’ रंग

दिवाळीपूर्वी तुम्ही देखील घर रंगवण्याचा विचार करत असाल तर वास्तूच्या या नियमांकडे लक्ष द्यायला पाहिजे. वास्तुशास्त्रनुसार, घराला योग्य रंग दिल्याने घरामध्य आनंद आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 09, 2025 | 11:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीच्या पवित्र सणाची सुरुवात लवकरच होत आहे. यावेळी लोक घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावट करण्याची तयारी सुरू करतात. जर तुम्हीही यावेळी तुमचे घर रंगवण्याचा विचार करत असाल तर वास्तू आणि फेंगशुईच्या नियमांनुसार रंग निवडल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. योग्य दिशा आणि वातावरणानुसार निवडलेले रंग फक्त भिंतींचे सौंदर्य वाढवतातच असे नाही तर घरात सकारात्मकता देखील आणतात.

लिविंग रूमसाठी वापरा हे रंग

घरामधील लिविंग रूम ही एक महत्त्वाची जागा मानली जाते. कारण पाहुणे आले की या ठिकाणी बसतात. त्यामुळे या खोलीच्या भिंतीसाठी पांढरा, क्रीम, हलका तपकिरी किंवा गुलाबी रंग वापरणे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या रंगांच्या पडद्याचा देखील वापर करु शकता.

Pratiyuti Yog: करवा चौथनंतर शनि आणि शुक्र ग्रह तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीचे लोक होऊ शकतात मालामाल

स्वयंपाकघरासाठी वापरा हे रंग

स्वयंपाकघर हे कौटुंबिक उर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी पांढरा रंग देणे उत्तम मानले जाते. जरी हा रंग लवकर खराब होत असला तरी नियमित साफसफाई केल्याने स्वयंपाकघरात स्वच्छता आणि सकारात्मकता टिकून राहते. पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने घरामध्ये संपत्ती आणि आरोग्य दोन्ही राखण्यास मदत होते.

बेडरुमसाठी करा या रंगांचा वापर

बेडरूम ही आराम करण्यासाठी एक उत्तम जागा मानली जाते. म्हणून या ठिकाणी हलके आणि सुखदायक रंगांची निवड करणे चांगले मानले जाते. आकाशी निळा, हलका हिरवा, गुलाबी आणि क्रीम रंग या रंगांचा खोलीमध्ये वापर केल्याने केवळ शांतता निर्माण होत नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. हे रंग वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि आनंद राखण्यास मदत करतात.

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात करा हे उपाय, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने संपत्तीमध्ये होईल वाढ

बाथरूमसाठी द्या हा रंग

पांढरा आणि गुलाबी रंग बाथरूमसाठी चांगला मानला जातो. विशेषतः गुलाबी रंग सकारात्मकता आणतो आणि आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत करतो असे मानले जाते. हे रंग बाथरूममध्ये हलकेपणा आणि ताजेपणाची भावना निर्माण करतात.

रंगकाम करताना या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष

गडद किंवा काळा रंगाचा वापर करणे टाळावे, कारण ते प्रकाश आणि सकारात्मकता दोन्ही कमी करू शकतात.

रंगवण्यापूर्वी ओलसर भागांची दुरुस्ती नक्की करा.

पर्यावरणपूरक आणि तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित रंग निवडा.

दिवाळीच्या 10 ते 12 दिवस आधी रंगकाम पूर्ण करा, जेणेकरून घरातील धूळ आणि वास पूर्णपणे निघून जाईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips for diwali home color vastu ideas choose this color according to vastu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Diwali Special Recipe: सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरी बनवा चविष्ट गुलाब श्रीखंड, चवीने जिंका साऱ्यांचे मन
1

Diwali Special Recipe: सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरी बनवा चविष्ट गुलाब श्रीखंड, चवीने जिंका साऱ्यांचे मन

दिवाळी सणाला पारंपरिक लुक हवा असेल तर ‘या’ डिझाईनचे Invisible Neckless नक्की करा ट्राय, गळ्यात दिसतील शोभून
2

दिवाळी सणाला पारंपरिक लुक हवा असेल तर ‘या’ डिझाईनचे Invisible Neckless नक्की करा ट्राय, गळ्यात दिसतील शोभून

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला या वस्तूंची करु नका खरेदी, देवी लक्ष्मी होईल नाराज आणि घरामध्ये येऊ शकते गरिबी
3

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला या वस्तूंची करु नका खरेदी, देवी लक्ष्मी होईल नाराज आणि घरामध्ये येऊ शकते गरिबी

Vastu Tips: तुळशीजवळ या वस्तू ठेवा, घरामध्ये येईल सकारात्मकता आणि प्रलंबित कामे होतील पूर्ण
4

Vastu Tips: तुळशीजवळ या वस्तू ठेवा, घरामध्ये येईल सकारात्मकता आणि प्रलंबित कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.