महाराष्ट्राचा 'हा' प्राचीन इतिहास लोकांसमोर येणेही तितकेच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य - Social Media)
सातवाहन राजवंशाचे मूळ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ भागात होते. त्यांच्या राजधानीचे स्थान जुन्नर आणि नंतर प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) येथे होते. गौतमीपुत्र शातकर्णी हा या वंशातील एक महान सम्राट होता, ज्याने शकोंचा पराभव केला. सातवाहन राजांनी नाशिक, कार्ले आणि अजिंठा येथील गुहांचे निर्माण केले. त्यांच्या काळात मराठी प्राकृत भाषेचा विकास झाला.
८व्या शतकात दंतिदुर्गाने राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना केली. राष्ट्रकूटांनी वेरूळ येथे कैलास मंदिराची निर्मिती केली. राष्ट्रकुटांची राजधानी मल्लखेड आहे.
यादव राजवंशाची स्थापना भिल्लम पाचव्या यांनी १२व्या शतकात केली. त्यांची राजधानी देवगिरी होती. या साम्राज्याने मराठी भाषेचा प्रचार केला. यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली. सध्याच्या क्षत्रिय मराठा समाजात या राजवंशांचे अनेक उपकुळ आढळून येतात.
वाकाटक राजवंशाची स्थापना ३व्या शतकात केली. त्यांची राजधानी वाशीम येथे होती. वाकाटक राजांनी अजंठा गुहांचे संरक्षण केले आणि बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले.
शिलाहार राजवंशाने ८व्या ते १३व्या शतकात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य केले. त्यांची राजधानी पन्हाळा आणि नंतर कोल्हापूर येथे होती. शिलाहार राजांनी अनेक किल्ल्यांचे बांधकाम केले आणि मराठी संस्कृतीला प्रोत्साहन दिले. शिलाहार या राजवंशाचा प्रभाव सध्याच्या मराठा समाजावर जाणवतो.