सुरुवातीला भांडण मग झाले प्रेम! अशी सुरु झाली विराट- अनुष्काची प्रेमकहाणी? (फोटो सौजन्य - x अकाउंट)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट खूप रंजक होती. २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट सेटवर झाली. विराट कोहलीने मुलाखतीत सांगितले होते की अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीत तो खूप घाबरला होता. तथापि, नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली.
२०१४ मध्ये विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले. हा सामना पाहण्यासाठी अनुष्काही पोहोचली. शतक पूर्ण केल्यानंतर, विराटने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनुष्काला फ्लाइंग किस दिली. आणि हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या.
यानंतर, ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट आणि अनुष्काचे लग्न झाले. त्यांचे लग्न शाही करण्यासाठी विराट-अनुष्काने पाण्यासारखा पैसे खर्च केला होता. या दोघांचे लग्न झाल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला.
लग्नाच्या ३ वर्षानंतर २०२१ मध्ये अनुष्काच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला. दोघेही पालक झाले आणि ही बातमी सोशल मीडियावर पसरली आणि चाहते त्यांचे अभिनंदन करू लागले. या दोघांनी मुलीचे नवा वामिका ठेवले. आणि यानंतर त्यांनी २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचे स्वागत केले ज्याचे नाव या जोडप्यानी अकाय ठेवले.
विराट अनुष्काच्या जोडीबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे ते दोघेही प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत उभे राहतात आणि एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा देतात. जेव्हा अनुष्काला विराटच्या खराब कामगिरीबद्दल ट्रोल केले जाते तेव्हा विराट देखील ट्रोलर्सना उत्तर देताना दिसतो.