लिव्हरमध्ये बरेचदा घाण साचून राहते आणि त्याला डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी एबीसी ज्युसचा रोज सकाळी रिकाम्यापोटी वापर करावा. जाणून घ्या अधिक माहिती
सफरचंद, बीट आणि गाजरचा रस आपल्या शरीरातील अवयव पूर्णपणे विषारी पदार्थ बाहेर टाकतो आणि रक्त शुद्ध ठेवतो
हा रस केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. हा रस पिण्यामुळे लाल रक्तपेशी तयार होतात आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते
या पेयामध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते आपल्या शरीराचे वजन लवकर कमी करते, ते तुमचे पोट बराच काळ भरलेले ठेवते ज्यामुळे आपल्याला कमी भूक लागते आणि या पेयामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे चयापचय वाढवते
हे डिटॉक्स ड्रिंक १ ग्लास पाणी, १ टेबलस्पून मध, १ टीस्पून लिंबाचा रस, गाजर, बीट आणि सफरचंद मिसळून तयार करता येते
हे पेय इतके फायदेशीर आहे की ते केवळ शरीराला डिटॉक्सिफाय करत नाही तर यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यासदेखील खूप उपयुक्त आहे