सर्वच महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिक लावतात. साडी, ड्रेस किंवा इतरही फॅशनेबल कपडे परिधान केल्यानंतर महिला ओठांना लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्यामुळे ओठ अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या आणि रंगाच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. पण काहीवेळा कोणत्या रंगाच्या साडीवर नेमकी कोणत्या रंगाची लिपस्टिक लावावी, हेच महिलांना समजत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसल्यानंतर कोणत्या रंगाची लिपस्टिक लावावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-pinterest)
साडीच्या रंगानुसार निवडा लिपस्टिकचा सुंदर शेड
अनेक महिला रोजच्या वापरात गुलाबी रंगांचे कपडे अधिक वापरतात. त्यामुळे या रंगाच्या साडी, ड्रेस किंवा इतर कपड्यांवर पिंक, फ्यूशिया, न्यूड पिंक, सॉफ्ट न्यूड लिपस्टिक लावू शकता.
निळ्या रंगाच्या साडी किंवा ड्रेसवर तुम्ही डीप प्लम, वाइन, मॉव रंगाच्या लिपस्टिक शेड्स लावू शकता. निळा रंग सर्वच त्वचा प्रकारच्या रंगावर अधिक खुलून दिसतो.
लाल रंगाच्या कॉटन, डिझाईनर साडीवर तुम्ही क्लासिक रेड, ब्रिक रेड किंवा चेरी रेड, डार्क रेड रंगाची लिपस्टिक लावू शकता. हे सर्व लिपस्टिकचे रंग लाल रंगावर अतिशय सुंदर दिसतात.
पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसल्यानंतर तुम्ही डार्क किंवा न्यूड लिपस्टिक लावू शकता. त्यामध्ये सॉफ्ट पिंक, क्रिमसन रेड किंवा लाल रंगाची उठावदार लिपस्टिक लावू शकता.
हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही लाल रंगाची किंवा न्यूड शेड्समध्ये असलेल्या लिपस्टिक लावू शकता.