OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर
एचपीने आज भारतात आपला नवा OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर केला. हाय-परफॉर्मन्स गेमिंग आणि उत्तम अनुभव शोधणाऱ्या गेमर्ससाठी खास डिझाइन केलेले हे डिव्हाइस, अत्याधुनिक Intel® Core™ Ultra किंवा AMD Ryzen™ AI प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce RTX™ 5070 Ti (12GB) GPU पर्यायांसह उपलब्ध आहे.
नवीन OMEN 16 मध्ये एचपीचे खास OMEN AI आणि Unleashed Mode दिले आहे. यामुळे गेमप्ले दरम्यान सिस्टम आपोआप FPS, स्टेबिलिटी आणि थर्मल्स कंट्रोल करून हाय परफॉर्मन्स देते. हा लॅपटॉप 170W प्रोसेसर पॉवर आणि 115W GPU सपोर्टसह गेमिंग लॅपटॉप्ससाठी नवा बेंचमार्क ठरतो. दीर्घकाळ गेमिंगसाठी यामध्ये अत्याधुनिक फॅन क्लीनिंग टेक्नॉलॉजी आहे, जी फॅन रिव्हर्स करून धूळ काढून टाकते आणि सिस्टम कायमस्वरूपी कार्यक्षम ठेवते. फक्त 46 dBA आवाजात हे डिव्हाइस शांततेने कार्य करते.
एचपी इंडिया येथील पर्सनल सिस्टिम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विनीत गेहाणी यांनी सांगितले, “गेमर्सना असा डिव्हाइस हवा असतो जो उच्च परफॉर्मन्ससोबत विश्वसनीय कूलिंग देतो. OMEN 16 मध्ये आम्ही AI-आधारित स्मार्ट परफॉर्मन्स, दमदार अनुभव आणि थर्मल ब्रेकथ्रूजसह नवा गेमिंग अनुभव देत आहोत.”
OMEN Gaming Hub च्या मदतीने गेमर्स आपले पॉवर मोड्स, कूलिंग प्राधान्ये आणि सिस्टम ट्यूनिंग सानुकूलित करू शकतात. तसेच, 4-झोन RGB कीबोर्ड, OMEN Light Studio द्वारे पूर्णपणे कस्टमायझेबल RGB लाइटिंग आणि RGB लाइट बार देण्यात आला आहे.
HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
नवीन OMEN 16 गेमिंग लॅपटॉप आता HP Online Store, HP World, Amazon, Croma, Reliance Digital आणि इतर प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत ₹1,29,999 असून हा लॅपटॉप Shadow Black रंगात येतो.