शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या पहिल्या सिरीजमध्ये सहर बंबा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस स्टाईलने ती सर्वात मोठ्या सुंदर अभिनेत्रीने देखील टक्कर देते. आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या डेब्यू शोचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. सहर बंबा या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहर अनेकदा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो आता चर्चात आहेत.
कोण आहे सहर बम्बा? जी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' मध्ये करणार रोमान्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सहर बंबाने २०१९ मध्ये सनी देओलचा मुलगा करण देओलसोबत 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने डिस्ने+ हॉटस्टारच्या 'द एम्पायर' आणि 'दिल बेकरार' या शोमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. सहर बंबा बी प्राकच्या 'इश्क नही करते' या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे.
अभिनयाव्यतिरिक्त, सहर नेहमीच तिच्या आत्मविश्वासाने आणि करिष्म्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. तिचा स्टाईल आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांना नेहमीच आवडला आहे. सहर बंबाचा हा फॅशन सेन्स आणि सेक्सी लूक तिला बॉलीवूडच्या अभिनेत्रीनेमध्ये वेगळे बनवतो.
सहर बंबाचा हा ब्लॅक स्लिट ड्रेस लूक खूपच बोल्ड आणि एलिगंट आहे. तिने साध्या पण स्टायलिश ड्रेससोबत कमीत कमी मेकअप आणि स्टेटमेंट इअररिंग्ज घातले आहेत. तिचा कॉन्फिडेंट पोज आणि ग्लॅमरस स्टाईल या लूकला आणखी खास बनवते.
सहर बंबाचा हा डेनिम ओव्हरऑल लूक कॅज्युअल आणि स्टायलिशचा परिपूर्ण उदाहरण आहे. पांढऱ्या क्रॉप टॉपसह सैल डेनिम आउटफिट तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहे. सॉफ्ट कर्ल हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअप या लूकला आणखी फ्रेश आणि मॉडर्न टच देत आहे.
सहर बंबाचा हा लाल गुलाबी रंगाचा ट्यूब ड्रेस लूक खूपच रॉयल आणि ग्लॅमरस आहे. ऑफ-शोल्डर डिझाइन आणि फुलांचे नक्षीकाम या पोशाखाला एक अनोखा लूक देत आहे. तिचा मेकअप, हेअर स्टाईल आणि तिचे डोळे चाहत्यांना घायाळ करणारे आहे.