स्टीलच्या भांड्यात ठेवताच विष बनतात 'हे' पदार्थ; तुमची एक चूक करेल आयुष्याचा घात
आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न अथवा खाण्याची कोणतीही गोष्ट ती स्टीलच्या भांड्यात साठवण्याची सवय आहे. मात्र तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?
घराघरात आढळणारं आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी खाल्लं जाणारं लोणचं स्टीलच्या भांड्यात कधीही साठवून ठेवू नये. लोणचं हे आम्लयुक्त असते ज्यामुळे ते स्टीलशी लवकर प्रतिक्रिया करते आणि यामुळे त्याची चव बदलू शकते आणि ते लवकर खराबही होऊ शकते
टोमॅटोपासून बनवले जाणारे कोणतेही पदार्थ स्टीलच्या भांड्यात साठवून ठेवू नये. टोमॅटोपासून बनवले गेलेले पदार्थ देखील स्टीलशी प्रतिक्रिया करतात आणि ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते
याशिवाय जेवणात वापरली जाणारी दही हा देखील असा पदार्थ आहे जो स्टीलच्या भांड्यात ठेवणे चांगले नाही. दह्यामध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात ज्यामुळे याला स्टीलच्या भांड्यात ठेवताच याची चव बदलते. तुम्ही दह्याला काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता
फळं किंवा फळांचं सॅलड देखील कधीही स्टीलच्या भांड्यात साठवू नका, यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. हे पदार्थ स्टीलशी प्रतिक्रिया करतात ज्यामुळे त्यांना स्टीलच्या भांड्यात ठेवणे टाळावे