सावधान! ईअरफोन्सचा वापर करताना या चुका करणं टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान (फोटो सौजन्य - pinterest)
अनेक वेळा चार्जिंग करताना लोक इयरफोन चार्जरमध्ये बराच वेळ ठेवतात. यामुळे बॅटरी जास्त चार्ज होते, उष्णता निर्माण होते आणि स्फोटाचा धोका वाढतो. चार्ज होताच इयरफोन चार्जरपासून वेगळे करा.
बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे इअरफोन्स हे निकृष्ट बॅटरी आणि निकृष्ट दर्जाचे इलेक्ट्रॉनिक घटक वापरतात, ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते. यामुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. चांगल्या दर्जाचे इअरफोन खरेदी करण्याला प्राधान्य द्या.
इअरफोनच्या नियमित वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. यामुळे बहिरेपणा देखील येऊ शकतो. तसेच कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे यासांरख्या समस्या उद्भवतात. इअरफोनचा वापर शक्य तितका कमी करा.
जर इअरफोन पाण्यात भिजले आणि तरीही चार्ज केले किंवा वापरले तर शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ओले इअरफोन वापरणं टाळा.
इअरफोन पडल्यास, दाबल्यास किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान झाल्यास त्यांचे अंतर्गत वायरिंग किंवा बॅटरी खराब होऊ शकते, त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान झालेले इअरफोन वापरण्याआधी ते चेक करा.
दुसऱ्या व्यक्तिने वापरलेले हेडफोन्सचा अजिबात वापरू नका. यामुळे कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.