Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

Online Fraud: सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्सनी आतापर्यंत अनेक नवीन पद्धती शोधल्या आहेत. या पद्धतींचा वापर करून सामान्य लोकांकडून पैसे उकळले जातात. अशाच सर्वात सामान्य पद्धतींबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 06:07 AM
डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात 'या' 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात 'या' 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • हॅकर्सचे हे 5 सामान्य फसवणूक प्रकार
  • ऑनलाइन फसवणूक टाळायची असेल तर सावध व्हा!
  • डिजिटल फसवणुकीचा धोका वाढतोय!
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगत झाली आहे. मात्र या प्रगतीसोबतच डिजीटल फ्रॉडच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवीन पध्दतींचा वापर करत आहेत. यामुळेच भारतातील अनेक शहारांमध्ये डिजीटल फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र काही सामान्य पद्धती देखील आहेत ज्यांचा सायबर गुन्हेगार वारंवार वापर करत असतात. या पद्धतींना लोकं बळी पडतात. या पद्धतींमध्ये सायबर गुन्हेगार आधी लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांचा विश्वास जिंकतात आणि त्यांनतर फसवणूक केली जाते. आता आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा सायबर गुन्हेगार सतत वापर करत असतात.

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

डिजिटल अरेस्ट

सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी डिजिटल अरेस्टची सर्वात सामान्य पद्धत वारंवार वापरतात. यामध्ये हॅकर्स पोलीस किंवा अधिक बनून लोकांना खोटा कॉल करतात. यावेळी लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या जातात. यामुळे लोकं घाबरतात आणि सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. आतापर्यंत डिजीटल अरेस्टच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि काहीवेळेस तर लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी ही सर्वात सामान्य पद्धत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

खोटे इन्वेस्टमेंट स्कॅम

गृह मंत्रालयाची सायबर सिक्योरिटी एजेंसी I4C ने सांगितलं आहे की, फेक इन्वेस्टमेंट स्कॅमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम किंवा सोशल मीडिया ग्रुपमध्ये आधी तुम्हाला सहभागी करतात. यानंतर गुन्हेगार लोकांना इन्वेस्टमेंटच्या हाई प्रॉफिटचा सल्ला देतात. सुरुवातीला खोट्या इन्वेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर नागरिकांना छोटे – छोटे रिटर्न दिले जातात. मात्र जेव्हा मोठी रक्कम गुंतवली जाते, तेव्हा गुन्हेगार हे पैसे घेऊन गायब होतात.

डिलीवरी स्कॅम

इन्वेस्टमेंटव्यतिरिक्त डिलीवरी स्कॅम किंवा पार्सल स्कॅमच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. हॅकर्स आधी सायबर गुन्हेगारांना कॉल करतात आणि त्यांना सांगतात की, त्यांचं पार्सल आलं आहे आणि त्यामध्ये चुकीचे डॉक्यूमेंट्स, ड्रग्स इत्यादी आहे. स्कॅमर काहीवेळा पोलीस अधिकारी बनून देखील लोकांना फोन करतात आणि पैशांची मागणी करतात.

वर्क फ्रॉम होम स्कॅम

लोकांना काम देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते. वर्क फ्रॉम होमच्या खोट्या जॉब ऑफर लोकांना पाठवून त्यांचे डॉक्यूमेंट्स गोळा केले जातात. त्यानंतर लोकांना वेगवेगळे टास्क असाइन केले जातात. हेच टास्क पूर्ण करताना बँक अकाऊंट कधी रिकामं होतं याबाबत लोकांना समजत देखील नाही.

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

सिम स्वॅप/कॉल फॉरवर्डिंग स्कॅम

साइबर क्रिमिनल्स लोकांना सिम स्वॅप आणि कॉल फॉरवर्डिंगद्वारे आपल्या जाळ्यात अडकवतात. स्कॅमर टेलीकॉम कंपनीचे एजेंट बनून लोकांना फोन करतात आणि त्यांना सिम कार्ड बदलण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर स्कॅमर्स नवीन सिम जारी करण्यासाठी कागदपत्रांची मागणी करतात. वापरकर्त्याच्या कागदपत्रांचा वापर करून, हॅकर्स त्यांच्या फोनवरील सिम कार्ड सक्रिय करतात जेणेकरून ते यूजरच्या नंबरवर पाठवलेले ओटीपी आणि कॉल प्राप्त करू शकतील. यानंतर यूजरचं बँक अकाऊंट रिकामं केलं जातं.

स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही व्यक्तिसोबत तुमची माहिती शेअर करू नका. ओटीपी आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका.

Web Title: Hackers use this common tricks for online fraud know how to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 06:07 AM

Topics:  

  • fraud
  • scam
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान
1

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स
2

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
3

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.