जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर आज आम्ही सांगत असलेले चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवेत. या चित्रपटांतील ट्विस्ट इतके भयंकर आहेत की चित्रपट पाहून लोकांचा थरकाप होऊ लागतो. यातील प्रत्येक चित्रपटात एक अनोखी कथा आणि अनोखा थरारक अनुभव पाहायला मिळणार आहे. हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत.
बॉलिवूडचे ते Suspence Thrillar चित्रपट जे आजही लोकांची झोप उडवतात, तुम्ही पाहिलेत का?

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांचा 'बदला' हा एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा हरवलेल्या सत्याचा शोध घेण्यावर आधारित आहे. यात अनेक रहस्यमयी गोष्टी घडताना दाखवण्यात आल्या आहे.

आमिर खानचा 'गजनी' हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात उत्तम चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात आमीरला मानसिक आघात झाला असून तो आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो

2012 साली रिलीज झालेला 'कहानी' हा चित्रपट देखील सस्पेन्सने तुडुंब भरलेला आहे. यात एक गर्भवती ब्रिटीश-भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर, तिच्या पतीचा शोध घेण्यासाठी दुर्गा पूजा उत्सवादरम्यान लंडन ते कोलकाता असा प्रवास करते. चित्रपटाचा शेवट फार रंजक आणि लक्षवेधी आहे

राधिका आपटेचा 'फोबिया' हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर एकदा जरूर पहा. यात टॅक्सी ड्रायव्हरने मुख्य भूमिकेचा विनयभंग केल्याने तिला ऍग्रोफोबिया रोग झाल्याचे दर्शवण्यात येते. यानंतर तिच्या आयुष्यात कोणकोणते बदल होतात आणि तिच्या मनात घराबाहेर पडण्याची कशी भीती रुतून बसते हे यात दाखवणात आले आहे

'रहस्य' हा अतिशय वेधक आणि थरारक चित्रपट आहे, चित्रपटाच्या कथेतील रहस्य आणि ट्विस्ट प्रेक्षकांना खूप प्रभावित करतात. हा चित्रपट लोकांच्या मनोविकारांवर आधारित एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. हा मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे.






