फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सध्या IIT खड़गपुरशिवाय देशातील इतर कोणत्याही IIT मध्ये मेडिकल कोर्सेस सुरू करण्याची परवानगी नॅशनल मेडिकल कौन्सिलकडून मिळालेली नाही. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सुमन चक्रवर्ती यांनी ३१ मार्च २०२६ रोजी याबाबत NMC मध्ये अर्ज दाखल केला होता. आपल्या या अर्जात IIT खड़गपुरने पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या २० जागांची मागणी केली होती.
IIT खड़गपुरमध्ये मेडिकल कोर्स सुरू करण्याच्या या अर्जाला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजेच शिक्षण मंत्रालयाचाही पाठिंबा मिळाला होता. या अर्जावर अंतिम निर्णय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर आणि नॅशनल मेडिकल कौन्सिलला घ्यायचा होता.
गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२६ मध्ये नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या टीमने IIT खड़गपुर कॅम्पसमध्ये असलेल्या डॉ. बी. सी. रॉय मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला होता. त्यानंतर NMC कडून हा कोर्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये NMC च्या टीमने IIT खड़गपुरच्या बलरामपुर कॅम्पसमध्ये असलेल्या श्यामा प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चलाही भेट दिली होती. अहवालानुसार, डॉक्टर ऑफ मेडिसिनचे विद्यार्थी येथे हँड्स-ऑन ट्रेनिंग घेतील. IIT खड़गपुरमध्ये केवळ NEET परीक्षेच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. यासाठी इन्स्टिट्यूकडून २० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे २०२७ च्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतील.
IIT खड़गपुरने जनरल मेडिसिन व्यतिरिक्त रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिनच्या शिक्षणासाठी NMC कडे अर्ज केला होता. पश्चिम बंगालमधील IIT खड़गपुर कॅम्पसमध्ये असलेल्या डॉ. व्ही. सी. रॉय मल्टी-स्पेशालिटी मेडिकल रिसर्च सेंटरची पायाभरणी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते १७ मे २००७ रोजी करण्यात आली होती. यामध्ये एमबीबीएस कॉलेजसोबतच सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलचीही पायाभरणी करण्यात आली होती.
Ans: नॅशनल मेडिकल कौन्सिलने (NMC) मंजुरी दिल्यानंतर IIT खड़गपुर हे पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल कोर्सेस (MD) सुरू करणारे देशातील पहिले IIT ठरले आहे.
Ans: IIT खड़गपुरमध्ये केवळ NEET परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिला जाईल. इन्स्टिट्यूटने पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या (MD) २० जागांसाठी अर्ज केला होता आणि २०२७ च्या सत्रापासून हे कोर्सेस सुरू होतील.
Ans: IIT खड़गपुरने जनरल मेडिसिन व्यतिरिक्त रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिन या विषयांच्या शिक्षणासाठी NMC कडे अर्ज केला होता.






