केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
Rahul Gandhi Girlfriend News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपल्या प्रेयसीचा उल्लेख केला आणि आपल्या केंब्रिजमधील दिवसांची एक आठवण सांगितली.
राहुल यांनी त्या जागेला भेट दिली जिथे त्यांच्या आई-वडिलांची पहिली भेट झाली होती.
राहुल गांधी म्हणाले की, लहानपणापासून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पहिल्या भेटीची गोष्ट अनेक वेळा ऐकली होती. अनेक वर्षांनंतर, जेव्हा ते स्वतः पुढील शिक्षणासाठी केंब्रिजला गेले, तेव्हा त्यांनी आपल्या प्रेयसीला त्या ऐतिहासिक रेस्टॉरंटमध्ये सोबत येण्यास सांगितले, जिथे त्यांच्या आई-वडिलांची पहिली भेट झाली होती.
त्या घटनेची आठवण सांगताना राहुल म्हणाला की, रेस्टॉरंटचा दरवाजा पिवळा होता. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि कर्मचाऱ्याने विचारले की किती लोक आहेत, तेव्हा त्याने उत्तर दिले, “दोन.” आत गेल्यावर त्यांनी मेन्यू पाहिला आणि जेवण मागवले. राहुलच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरंटमधील वेटरने राजीव आणि सोनिया गांधी यांच्या पूर्वीच्या भेटींच्या आठवणीही सांगितल्या. राहुलने तीच चिकन डिश मागवली जी त्याचे आई-वडील नेहमी खायचे.






