मराठी अभिनेत्री हेमल इंगळेने 2024 च्या आयपीएल सीझनमध्ये अँकर म्हणून पदार्पण केले होते आणि या अभिनेत्रीने सगळ्याचे लक्ष तिच्या अँकरिंग कौशल्यामुळे वेधले होते. हेमल चाहत्यांची लागेचच पसंती बनली होती. तिने IPL प्रसारणात एक नवीन आणि आकर्षक दृष्टीकोन निर्माण केला होता. तिच्या आकर्षित व्यक्तिमत्वाने आणि स्टायलिश उपस्थितीने, हेमलने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आणि IPL अनुभवात तिचा एक अनोखा स्वभाव प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
मराठी अभिनेत्री हेमल इंगळे आता नुकताच प्रदर्शित होणार मराठी चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २' या मध्ये ही अभिनेत्री झळकताना दिसणार आहे. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या साखर पुड्याचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अनेक मराठी कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री हेमल इंगळेच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोनक चोरडिया असून, या दोघांचे फोटो आता चर्चेत आहेत.
मराठी अभिनेत्री हेमल इंगळेने IPL 2024 मध्ये अँकर म्हणून जबरदस्त पदार्पण केले आणि तिच्या आकर्षित आणि उत्साहाच्या स्वभावाने प्रेक्षकांना मोहित केले आहे.
पहिल्याच सामन्यापासून, हेमल इंगळेचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे सखोल ज्ञान यामुळे आयपीएल चाहत्यांची मने जिंकली आणि तिचे घराघरात नाव झाले. तसेच ती चाहत्यांची पसंती बसली.
Instagram आणि Twitter सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हेमलची उपस्थिती गगनाला भिडली आहे. चाहते उत्सुकतेने तिचे सोशल मीडियावरील सगळे अपडेट्स पाहत असतात. अभिनेत्रीचा चाहता वर्गदेखील जास्त आहे.
तिच्या अँकरिंगच्या आकर्षणाव्यतिरिक्त, हेमलने तिच्या सखोल क्रिकेट विश्लेषणाने दर्शकांना प्रभावित केले, तिचे कौशल्य आणि खेळाबद्दलची आवड चाहत्यांना दिसली.
तसेच अभिनेत्री हेमल इंगळे आता लवकरच मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसून येणार आहे. ती या आधी ‘अशी ही आशिकी’ चित्रपटामधून प्रेक्षकांना दिसली होती. परंतु ती आता ‘नवरा माझा नवसाचा २’मुळे भरपूर चर्चेत असताना दिसत आहे.
हेमल इंगळे आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असून, तिचा आगामी मराठी चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा २’ देखील चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.