Constant stress leads to an increase in belly fat—how can you reduce it?(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
एका सर्वेक्षणातील माहितीनुसार, पोटाची चरबी वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. खाण्याच्या वाईट सवयींव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते. तणावाच्या वेळी महिलांच्या शरीरात कॉर्टिसोल हा हार्मोन सोडला जातो. कोर्टिसोलची उच्च पातळी आणि कमी पातळी दोन्ही अनेक आरोग्य समस्यांना जन्म देतात. कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे पोटावर चरबी जमा होऊ लागते. जर तुम्ही सतत तणावाखाली असाल तर कोर्टिसोलमुळे पोटाची चरबी कमी करणे कठीण होते
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार बंगळुरूच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ नेहा कडबम म्हणतात, ‘कॉर्टिसॉल बेली फॅटला स्ट्रेस बेली’ असेही म्हणतात. सततच्या उच्च पातळीच्या तणावामुळे शरीराच्या मध्यभागी चरबी जमा होते. ही स्थिती मुख्यतः कॉर्टिसॉल हार्मोनच्या वाढीमुळे उद्भवते, जे तणावाच्या काळात अधिवृक्क ग्रंथींमधून स्रावित होते.
कोर्टिसोलच्या उच्च पातळीच्या सतत संपर्कामुळे पोटावर चरबी जमा होते. कॉर्टिसॉल शरीराला ताणतणावांना प्रतिसाद देते, रक्तदाब, रक्तातील साखर आणि चयापचय नियंत्रित करण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. तणाव, स्टिरॉइडचा वापर आणि ट्यूमर देखील कोर्टिसोलची पातळी वाढवू शकतात. काही लोकांसाठी, कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे जास्त खाणे आणि त्यानंतरचे वजन वाढू शकते. उच्च कोर्टिसोल पातळी व्यवस्थापित करणे महत्वाचे आहे.त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढत जातो.
Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम. विशेषतः वेगाने चालणे, धावणे किंवा पोहणे यासारख्या एरोबिक साधन करणे सुरू करा. हे तणाव कमी करण्यात आणि कोर्टिसोल पातळी सामान्य करण्यात मदत करू शकतात.ताजी फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने कोर्टिसोलचे परिणाम कमी करता येतात. साधे कार्बोहायड्रेट्स पोटाची चरबी वाढवतात. साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रुक्टोजयुक्त पेय टाळा.
डॉक्टरांच्या मते, ‘चांगली झोप घेतल्याने शरीराला तणावातून सावरण्यास आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. प्रत्येक रात्री 7-9 तासांची झोप महत्वाची ठरते .तुम्हाला ताण आणि वजन व्यवस्थापित करण्यात अडचण येत असल्यास,डॉक्टरांची भेट घ्या . उपचार न केल्यास, कोर्टिसोल बेली फॅटमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, पाय आणि फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या आढळू शकतात. नैराश्य आणि मूड स्विंगसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते
Ans: कोर्टिसोल हा अधिवृक्क ग्रंथींमधून स्रवणारा हार्मोन आहे. तो शरीराला तणावाचा सामना करण्यास मदत करतो. तसेच रक्तातील साखर, रक्तदाब, चयापचय आणि दाह नियंत्रित करण्यात त्याची भूमिका असते.
Ans: होय, दीर्घकाळचा तणाव वजन वाढण्यास हातभार लावू शकतो. तणावामुळे झोपेवर, भुकेवर आणि खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. कोर्टिसोलमधील बदलांचाही यात सहभाग असू शकतो.
Ans: बहुतेक प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. नियमित झोपेची वेळ आणि पुरेशी विश्रांती तणावाचे व्यवस्थापन आणि निरोगी वजन राखण्यास मदत करू शकतात.






