Brazil Election 2026 (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी लुला दा सिल्वा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यांना ५१.७९ टक्के मते मिळाली. या विजयामुळे ते चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
लुला यांनी प्रतिस्पर्धी फ्लाविओ बोल्सोनारो यांचा पराभव केला. फ्लाविओ यांना ४८.२१ टक्के मते मिळाली. निवडणूक निकालानंतर त्यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला. असे लुला यांनी सांगितले .
पहिल्या फेरीत पिछाडीवर असलेल्या लुला यांनी दुसऱ्या फेरीत जोरदार मुसंडी मारली. तरुण मतदार आणि समर्थकांच्या प्रचारामुळे त्यांच्या मोहिमेला बळ मिळाले. अखेर त्यांनी ४.४ दशलक्ष मतांच्या फरकाने विजय मिळवला
लुला यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला. साओ पाउलो आणि रिओ दी जानेरोमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला. ब्राझीलचे झेंडे फडकावत समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला
नव्या कार्यकाळात लुला यांच्यासमोर अर्थव्यवस्था आणि महागाईची आव्हाने असतील. काँग्रेसमधील विरोधी पक्षांचे वर्चस्वही त्यांच्यासाठी कसोटी ठरणार आहे. जागतिक राजकारणात ब्राझीलची भूमिका अधिक मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल